मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Crime: अल्पवयीन विद्यार्थ्यांना पॉर्न व्हिडिओ दाखवायचा ट्यूशन टीचर; 'असं' फुटलं बिंग

Crime: अल्पवयीन विद्यार्थ्यांना पॉर्न व्हिडिओ दाखवायचा ट्यूशन टीचर; 'असं' फुटलं बिंग

Aug 17, 2023 07:51 PM IST

Uttar Pradesh Tuition teacher: उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे अल्पवयीन मुलांना पॉर्न व्हिडिओ दाखवणाऱ्या ट्यूशन टीचराला पालकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

Crime News Marathi
Crime News Marathi (HT)

Kanpur News: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनींना शिकवण्याच्या बहाण्याने मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या ट्यूशन टीचरला अटक करण्यात आली. आरोपी विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ दाखवून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा, असा त्याच्यावर आरोप आहे. ट्यूशन टीचरचा मोबाईल तपासला असता त्यात अनेक अश्लील व्हिडिओ सापडले. याप्रकरणी पोलीस आरोपी टीचरची कसून चौकशी करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील चमनगंजमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने आरोपीला त्यांच्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलींना घरी शिकवण्यासाठी कामावर ठेवले होते. आरोपी बराच वेळ दोन्ही मुलींना शिकवण्यासाठी घरी यायचा. दरम्यान, त्याने मोबाईलवर मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवण्यास सुरुवात केली. तसेच तो मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा.

आरोपीच्या या कृत्याबद्दल दोन्ही मुलींनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. त्या लोकांनी आरोपीचा मोबाईल तपासला, तेव्हा त्यात अनेक अश्लील व्हिडिओ असल्याचे त्यांना दिसले. कुटुंबीयांनी आधी आरोपीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांना बोलावले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व माहिती घेतली आणि आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले.

पीडितेच्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एडीसीपी अशोक कुमार सिंह यांनी सांगितले. जे काही तथ्य समोर येईल, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

WhatsApp channel
विभाग