मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Swiggy: स्विगीच्या ३८० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, बेरोजगारीचं संकट आणखी गडद

Swiggy: स्विगीच्या ३८० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, बेरोजगारीचं संकट आणखी गडद

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 21, 2023 01:20 PM IST

व्हेंचर फंडिंग मार्केटच्या अडचणींचे कारण देत फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने त्याच्या कंपनीतील ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

Swiggy
Swiggy

Swiggy lays off 380 employees: ट्विटर आणि अमेझॉनकडून गेल्या काही दिवसांपासून नोकरकपात सुरू असताना फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीने त्यांच्या ३८० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. व्हेंचर फंडिंग मार्केटच्या अडचणींचे कारण देत कंपनींनी या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे बेरोजगारीच्या संख्येत आणखी वाढ झालीय. आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर स्टार्टअप्स कंपन्यांनीदेखील नोकरकपात सुरू केली आहेत.

आम्ही पुनर्रचनेचा भाग म्हणून एक कठीण निर्णय घेत आमच्या कंपनीतील हेडकाऊंट कमी करत आहोत. आम्ही आमच्या कंपनीतील ३८० कर्मचाऱ्यांना निरोप देणार आहोत. सर्व उपलब्ध पर्याय शोधल्यानंतर आम्ही हा अत्यंत कठीण निर्णय घेत आहोत. या सर्व कर्मचाऱ्यांबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं स्विगीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मॅजेती यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांना काढलं जाणार आहे, त्यांना कार्यकाळ आणि ग्रेडनुसार तीन ते सहा महिन्यांचा पगार दिला जाणार आहे. यामध्ये व्हेरिएबल पेच्या १०० टक्के पेआऊटचा समावेश असल्याचे समजत आहे.

गुगलच्या १२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार

Google ची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंक (GOOGL.O) मध्ये नोकरकपात केली जाणार आहे. कंपनी जवळपास १२,००० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे. अल्फाबेट इंकमध्ये होणारी नोकरकपात टेक सेक्टरमध्ये मोठा झटका मानला जात आहे. आर्थिक मंदीच्या शक्यतेने जगभरातील कंपन्यांमध्ये २०२२ पासून नोकरकपातीचे सुरू झालेले सत्र यावर्षीय कायम आहे.

मायक्रोसॉफ्ट १० हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा तयारीत

मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनी तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीचे घटता महसूल काळजीचे कारण सांगितले जात आहे. मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीच्या आधी अमेझॉन, सेल्सफोर्स सारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला भारताची स्टार्ट अप कंपनी शेयरचॅटनेही ६०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले होते.

IPL_Entry_Point

विभाग