मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  जम्मू-श्रीनगर महामार्गावर बोगद्याचा भाग कोसळला; अनेक जण अडकल्याची भीती

जम्मू-श्रीनगर महामार्गावर बोगद्याचा भाग कोसळला; अनेक जण अडकल्याची भीती

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 20, 2022 01:51 PM IST

बोगद्याचे काम सुरू असतांना मेकरकोट परिसरातील खूनी नाला येथे बोगद्याचा काही भाग कोसळला. या ढिगा-याखाली ५ ते ७ जण दबले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जम्मू श्रीनगर महामर्गावर बोगद्याचा भाग कोसळला
जम्मू श्रीनगर महामर्गावर बोगद्याचा भाग कोसळला

जम्मू : जम्मू-श्रीनगर मार्गावर कनेक्टीव्हिटी वाढवण्यासाठी बोगद्याचे काम सुरू आहे. या बोगद्यामुळे अंतर आणि वेळेची बचत होणार आहे. दरम्यान, या बोगद्याच्या कामावेळी गुरूवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. बोगद्याचे काम सुरू असतांना मेकरकोट परिसरातील खूनी नाला येथे बोगद्याचा काही भाग कोसळला. या ढिगा-याखाली ५ ते ७ जण दबले गेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोघांना बचाव पथकाने बाहेर काढले आहे.

जम्मू-श्रीनगर मार्गावर बांधण्यात येत असलेला हा बोगदा सामरिकदृष्ट्या महत्वाचा आहे. त्या दृष्टीकोणातू हा बोगदा तयार केला जात आहे. दरम्यान बोगद्याचे काम सुरू असतांना अचानक बोगद्याचा काही भाग कोसळला. रामबनचे उपायुक्त मसरतुल इस्लाम आणि एसएसपी मोहिता शर्मा बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

बचाव पथकातील एका अधिका-याने सांगितले की, ढिगा-याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहिम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत दोघांची सुटका करण्यात आली आहे. ढिगा-याखाली आणखी पाच ते ७ जण असण्याची शक्तला आहे. बोगद्यात अडकलेले नागरिक हे या बोगद्याचे आॅडिट करत होते. दरम्यान, बनिहालहून घटनास्थळी अनेक रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. ही घटना जेव्हा घडली तेव्हा, बोगद्यासमोर बुलडोझर आणि ट्रकसह अनेक यांत्रीक वाहने उभी होती. ढिगा-याचा मोठा भाग या यंत्रावर पडल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.

IPL_Entry_Point