मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Republic Day 2023: ...म्हणून प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपती तिरंगा फडकावतात

Republic Day 2023: ...म्हणून प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपती तिरंगा फडकावतात

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 26, 2023 01:18 PM IST

Republic Day 2023: देशाच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Republic Day 2023
Republic Day 2023

Republic Day 2023: देशभरात आज ७४व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर ध्वजारोहण पार पडले. यावेळी राष्ट्रगीत म्हणण्यात आले असून २१ तोफांची सलामी देण्यात आली. पण प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वजारोहण का केले जाते? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, त्यामागचे कारण जाणून घेऊयात.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आजही राजपथावर इंडिया गेट ते राष्ट्रपती भवनापर्यंत भव्य परेड काढण्यात आली. या परेडमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल, नौदल इत्यादींच्या विविध रेजिमेंट्स सहभाही झाले होते. याशिवाय, आजच्या दिवशी देशभरात तिरंगा फडकावण्याबरोबरच, राष्ट्रगीत गाणे, आपण भारतीय एकतर अनेक कार्यक्रम आयोजन करण्यात आले.

प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान तिरंगा का फडकवत नाहीत?

भारताला १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा संविधान नसल्याने पंतप्रधान देशाचे प्रमुख होते. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्यावरून प्रथमच ध्वजारोहण केले. तेव्हापासून पंतप्रधान १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. २६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले. संविधान सभेने १९५० मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली. राष्ट्रपतींना देशाचे प्रथम नागरिक मानले गेले. तेव्हापासून आजपर्यंत २६ जानेवारीला राष्ट्रपती तिरंगा फडकवतात.

महत्वाचे म्हणजे, भारतात २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन दिवशी देशभरात तिरंगा फडकावला जातो. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वज तळापासून दोरीने ओढला जातो आणि वर घेतला जातो, नंतर फडकवला जातो. प्रजासत्ताक दिनी ध्वज वर बांधला जातो, जो उघडून फडकवला जातो.

IPL_Entry_Point

विभाग