मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Republic Day 2023: अभिमानास्पद! महाराष्ट्रातील चार पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर

Republic Day 2023: अभिमानास्पद! महाराष्ट्रातील चार पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 26, 2023 07:13 AM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या ९३ राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये महाराष्ट्रातील चार पोलिसांचा समावेश आहे.

Maharashtra police
Maharashtra police

Maharashtra Police: प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने देशातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ९०१ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली आहे. देशातील ९३ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना उल्लेखनीय सेवेकरिता राष्ट्रपती पदके जाहीर झाली असून यामध्ये यात महाराष्ट्रातील चार पोलिसांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील विविध राज्यांतील एकूण ९०१ पोलिसांना पदके जाहीर करण्यात आले आहेत. यातील १४० जणांना शौर्य पोलीस पदक,९३ राष्ट्रपती पोलीस पदक आणि ६६८ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे, गृह मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या ९३ राष्ट्रपती पदकांमध्ये महाराष्ट्रातील चार पोलिसांचा समावेश आहे.विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलिस महासंचालक अनुपकुमार सिंह, उपनिरीक्षक संभाजी देशमुख, दीपक जाधव अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

पोलिस दलामध्ये गुणवत्तापूर्वक सेवा बजावल्याप्रकरणी राज्यातील ३९ पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदके जाहीर करण्यात आली आहेत. मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम, सहआयुक्त जय कुमार, आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त निशित मिश्रा, अधीक्षक संतोष गायके, सहायक आयुक्त चंद्रकांत मकर, निरीक्षक दीपक चव्हाण, रमेश कठार, देविदास घेवरे, सुधाकर काटे, शैलेश पासलवाड, मनोज नेर्लेकर, शाम शिंदे, अलका देशमुख, दत्तात्रय पाबळे, बापू ओवे, प्रसाद पांढरे, शिरीष पवार, सदाशिव पाटील, सुरेश गाठेकर, दिलीप सावंत, संतोष कोयंडे, चंद्रकांत लांबट, झाकीरहुसेन किल्लेदार, भरत पाटील, प्रमोद कित्ये, आनंद घेवडे, सुकदेव मुरकुटे, गोकुळ वाघ, धनंजय बारभाई, सुनील गोपाळ, दत्तात्रय काढणोर, ज्ञानेश्वर आवारी, रामकृष्ण पवार, ओमप्रकाश कोकाटे, सुभाष गोईलकर, संजय कुपेकर, प्रदीप अहिरे, प्रकाश घाडगे, विजय पवार या पोलिसांचा पदक मानकऱ्यांमध्ये समावेश आहे.

IPL_Entry_Point

विभाग