मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी जाहीर माफी मागितली, म्हणाले आमचं चुकलं"

"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी जाहीर माफी मागितली, म्हणाले आमचं चुकलं"

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 11, 2023 05:29 PM IST

NRI darshan Dhaliwal : शेतकरी आंदोलनावेळी दिल्ली विमानतळावरून परत पाठवल्यामुळे मोदींनी आपली माफी मागितल्याचा दावा अनिवासी भारतीय उद्योगपती दर्शनसिंग धारिवाल यांनी एका मुलाखतीत केला आहे.

नरेंद्र मोदींची माफी
नरेंद्र मोदींची माफी

नवी दिल्ली– अमेरिकेत स्थायी झालेले अनिवासी भारतीय उद्योगपती आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार विजेते दर्शनसिंग धालीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. २०२२ मधील एका घटनेवरून त्यांनी मोदींबाबत म्हटले की, पंतप्रधान मोदींनी जवळपास दीडशे लोकांसमोर माझी माफी मागितली आणि आमच्याकडून मोठी चूक झाली असं म्हटल्याचं धालीवाल यांनी दावा केला आहे.

धारिवाल यांनी म्हटलं की, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू असताना मला विमानतळावरूनच अमेरिकेला परत पाठवले होते. याबद्दल मोदींनी परत माफी मागितली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. पंतप्रधान म्हणाले, त्यावेळी आमच्याकडून मोठी चूक झाली आहे, तुम्हाला परत पाठवलं. परंतु तुमचा मोठेपणा आहे जे आमच्या सांगण्यावरून तुम्ही परत आला असं त्यांनी म्हटलं आहे.

दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावेळी धारिवाल यांनी लंगर व्यवस्था केली होती. यामुळे दर्शन सिंह धालीवाल यांना मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिल्ली एअरपोर्टवरून बाहेर पाठवण्यात आले होते. मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळाल्यानंतर धालीवाल यांनी ही मुलाखत दिली.

धारिवाल म्हणाले की, विमानामधून परत पाठवण्याच्या त्या घटनेचा उल्लेख करत दर्शन सिंह धालीवाल यांनी म्हटलं की, एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी मला सांगितले की, दिल्ली बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनातील लंगर थांबवा आणि आंदोलनात शेतकरी व सरकारमध्ये मध्यस्थी करा किंवा त अमेरिकेला परत जा. धारिवाल म्हणाले की, डिसेंबर २०२१ मध्ये जेव्हा शेतकरी दिल्लीत आले होते तेव्हा रात्री पाऊस होता. त्याचा व्हिडिओ मी पाहिला होता. शेतकरी थंडीत झोपले होते. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने मी शेतकरी आंदोलनात लंगर व टेंटची सोय केली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या