मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नोक्स यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

Nobel Prize 2022 : फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नोक्स यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 06, 2022 05:53 PM IST

जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार(NobelPrize 2022) जाहीर झाला आहे.यावर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कारफ्रेंच लेखिकाअ‍ॅनी अर्नोक्स (French author annie ernaux) यांना जाहीर झाला आहे.

फ्रेंच लेखिकाअ‍ॅनी अर्नोक्स
फ्रेंच लेखिकाअ‍ॅनी अर्नोक्स

Nobel prize 2022 inliterature : जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2022) जाहीर झाला आहे. यावर्षीचा साहित्यातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नोक्स (French author annie ernaux) यांना जाहीर झाला आहे.अ‍ॅनी अर्नोक्स यांचा जन्म सन १९४० मध्ये झाला होता आणि त्यांचे बालपण नॉरमँडीमधील छोटे शहर यवेटोटमध्ये गेले.

अ‍ॅनी अर्नोक्स चे म्हणणे आहे की, लेखन एक राजकीय कार्य आहे,जे सामाजिक असमानतेबाबत आपले डोळे उघडते.

मागील वर्षी साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार तंजानियामध्ये जन्मलेले ब्रिटिश उपन्यासकार अब्दुल रज्जाक गुरनाह यांना दिला होता. ते १९८६ चे पुरस्कार विजेते सोयिंका यांच्यानंतर पुरस्कार जिंकणारे दूसरे कृष्णवर्णीय आफ्रिकी लेखक होते आणि १९९३ मधील पुरस्कार विजेते टोनी मॉरिसन यांच्यानंतर चौथे अश्वेत लेखक होते.

अ‍ॅनी अर्नोक्स यांनी फ्रेंच, इंग्रजी भाषेत कांदबरी, लेख, नाटके आणि चित्रपटांसाठी लेखन केले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या