मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Kerala Bus Accident: केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, ३८ जखमी

Kerala Bus Accident: केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, ३८ जखमी

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 06, 2022 09:27 AM IST

Kerala Bus Accident: एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस केएसआरटीसीच्या बसला धडकल्याने ही दुर्घटना घडली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, ३८ जखमी
केरळमध्ये दोन बसचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, ३८ जखमी

Kerala Bus Accident:केरळमध्ये दोन बसची भीषण धडक होऊन ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामध्ये ४० जण जखमी झाले आहेत. पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरीमध्ये ही दुर्घटना घडली असून दोन भरधाव बसची समोरासमोर धडक झाली. बस एर्नाकुलमच्या मुलंथुरुथीमधील बेसलियस स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र पलक्कड जिल्ह्याच्या वडक्कनचेरी इथं केएसआरटीसीच्या बसला धडकली. या अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ आणि आक्रोश सुरू होता.

पर्यकांच्या बसवरील नियंत्रण सुटले आणि एका कारला ओव्हरटेक करताना केएसआरटीसीच्या बसला मागून धडक दिली. यानंतर पर्यटकांची बस दलदलीत घसरली. ही दुर्घटना वालयार-वडक्कनचेरी राष्ट्रीय महामार्गावर अंजुमूर्ती मंगलम बसस्टॉपजवळ घडली.

मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. यात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत तर २८ जण किरकोळ जखमी आहेत. पर्यटकांच्या बसमध्ये ४१ विद्यार्थी, पाच शिक्षक आणि दोन कर्मचारी होते. तर केएसआरटीसीच्या बसमधून ४९ प्रवासी प्रवास करत होते.

मृतांमध्ये केएसआरटीसी बसमधील तीन तर पर्यटकांच्या बसमधील ६ प्रवाशांचा समावेश आहे. सहा पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली आहे. जखमींना पलक्कड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत. या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग