मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  iPhone 14 येतोय बाजारात ! जाणून घ्या स्टायलिश लूक सोबत फोनची किंमत

iPhone 14 येतोय बाजारात ! जाणून घ्या स्टायलिश लूक सोबत फोनची किंमत

May 18, 2022 06:44 PM IST Shaurya Tomer
  • twitter
  • twitter

आयफोन १४ बाजारात येण्यापूर्वीच त्याची क्रेझ आयफोनच्या चाहत्यांमध्ये दिसून येत आहे. या फोनची आतूरतेने ते वाट पाहत आहे. दरम्यान या फोनच्या फिचर्स बद्दल अनेक माहिती आता पुढे येऊ लागली आहे. एका टिप्स्टरने दिलेल्या वृत्तानुसार या फोनची किंमतही पुढे आली आहे. तर जाणून घ्या आयफोन १४ च्या विविध फिचर्स बद्दल आणि किंमतही !

अ‍ॅपल आयफोनच्या १४ सिरीज मध्ये विविध प्रॉडक्ट बाजारात आणण्याची शक्यता आहे. यात आयफोन १४, आयफोन १४ मॅक्स, आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स हे चार प्रॉडक्ट बाजारात येण्याची शक्यता आहे. आयफोन १४ मिनी ाऐवजी आयफोन १४ मॅक्स कंपनीतर्फे बाजारात आणला जाणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(1 / 5)

अ‍ॅपल आयफोनच्या १४ सिरीज मध्ये विविध प्रॉडक्ट बाजारात आणण्याची शक्यता आहे. यात आयफोन १४, आयफोन १४ मॅक्स, आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स हे चार प्रॉडक्ट बाजारात येण्याची शक्यता आहे. आयफोन १४ मिनी ाऐवजी आयफोन १४ मॅक्स कंपनीतर्फे बाजारात आणला जाणार आहे.(ShrimpApplePro)

आयफोन १४ ची किंमत भारतीय बाजारात ७९९ डॉलर आणि आयफोन १४ मॅक्सची किंमत ८९९ डॉलर असण्याची शक्यता आहे. आयफोन १४ प्रो सारख्या प्रो मॉडल्सची किंमत ९९९ डॉलर आणि आयफोन १४ प्रो मॅक्सची किंमत जवळपास १ हजार ९९ डॉलर असू शकते. याचा अर्थ भारतीय रुपयांमध्ये याची किंमत अंदाजे ७० हजार रुपयांच्या आसपास राहणार आहे. या सोबतच भारतीयांना हा फोन घेतांना अतिरिक्त करही भरावा लागणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 5)

आयफोन १४ ची किंमत भारतीय बाजारात ७९९ डॉलर आणि आयफोन १४ मॅक्सची किंमत ८९९ डॉलर असण्याची शक्यता आहे. आयफोन १४ प्रो सारख्या प्रो मॉडल्सची किंमत ९९९ डॉलर आणि आयफोन १४ प्रो मॅक्सची किंमत जवळपास १ हजार ९९ डॉलर असू शकते. याचा अर्थ भारतीय रुपयांमध्ये याची किंमत अंदाजे ७० हजार रुपयांच्या आसपास राहणार आहे. या सोबतच भारतीयांना हा फोन घेतांना अतिरिक्त करही भरावा लागणार आहे.(Reuters)

या सोबतच बदलती जागतिक परिस्थीती, कच्च्या मालाची आणि फोनसाठी लागणा-या चिप्सची कमतरता याचाही परिणाम आयफोन १४ किंमतीवर होऊ शकतो. अ‍ॅपल हा फोन त्यांच्या दरांमुळेही बाजारात ओळखला जातो. अ‍ॅपल १३ प्रमाणेच अ‍ॅपल १४ आपल्या दरासाठी प्रसिद्ध राहणार आहे.
twitterfacebookfacebook
share

(3 / 5)

या सोबतच बदलती जागतिक परिस्थीती, कच्च्या मालाची आणि फोनसाठी लागणा-या चिप्सची कमतरता याचाही परिणाम आयफोन १४ किंमतीवर होऊ शकतो. अ‍ॅपल हा फोन त्यांच्या दरांमुळेही बाजारात ओळखला जातो. अ‍ॅपल १३ प्रमाणेच अ‍ॅपल १४ आपल्या दरासाठी प्रसिद्ध राहणार आहे.(REUTERS)

आयफोन १४ डिझाईनच्या बाबतीतही खास राहणार आहे. प्रो मॉडेल्स ‘नॉच-लेस’ बाजारात आणण्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. सीएडी रेंडरनुसार, आयफोन १४ मध्ये त्याच्या बाजूला पंच-होलसह गोळीच्या आकाराचे होल-पंच कटआउट दिले जाणार आहे. तर नॉन-प्रो आयफोन १४ चे मॉडेल्स अजूनही एका छोट्या नॉचसह बाजारात येण्याची शक्यता आहे.
twitterfacebookfacebook
share

(4 / 5)

आयफोन १४ डिझाईनच्या बाबतीतही खास राहणार आहे. प्रो मॉडेल्स ‘नॉच-लेस’ बाजारात आणण्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. सीएडी रेंडरनुसार, आयफोन १४ मध्ये त्याच्या बाजूला पंच-होलसह गोळीच्या आकाराचे होल-पंच कटआउट दिले जाणार आहे. तर नॉन-प्रो आयफोन १४ चे मॉडेल्स अजूनही एका छोट्या नॉचसह बाजारात येण्याची शक्यता आहे.(IceUniverse)

लीकनुसार, स्टँडर्ड आयफोन १४ आणि आयफोन १४ प्रो ६.१ इंच डिस्प्लेसह येतात. तर आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्समध्ये ६.७  इंचाचा डिस्प्ले आहे. पण अ‍ॅपलकडून या बाबत अधिकृत दुजोरा मिळेपर्यंत हा सगळा तपशील गुलदस्त्यात राहणार आहे. लाँचिंगच्या दरम्यान या सर्वांचा उलगडा होणार आहे. त्यामुळे ग्राहकांची उत्सूकता ही या फोनबाबत आत्तापासूनच ताणायला लागली आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 5)

लीकनुसार, स्टँडर्ड आयफोन १४ आणि आयफोन १४ प्रो ६.१ इंच डिस्प्लेसह येतात. तर आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्समध्ये ६.७  इंचाचा डिस्प्ले आहे. पण अ‍ॅपलकडून या बाबत अधिकृत दुजोरा मिळेपर्यंत हा सगळा तपशील गुलदस्त्यात राहणार आहे. लाँचिंगच्या दरम्यान या सर्वांचा उलगडा होणार आहे. त्यामुळे ग्राहकांची उत्सूकता ही या फोनबाबत आत्तापासूनच ताणायला लागली आहे.(@SaranByte via Twitter from Weibo)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज