मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  राष्ट्रपतींचे वेतन आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा माहिती आहेत का?

राष्ट्रपतींचे वेतन आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा माहिती आहेत का?

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jul 25, 2022 11:05 AM IST

राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आणि प्रथम नागरिक असतात. राष्ट्रपतींना आणि माजी राष्ट्रपतींना वेतन आणि इतर अनेक सुविधा दिल्या जातात.

द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ
द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ (फोटो - पीटीआय)

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी पद आणि गोपनियतेची शपथ आज घेतली. संसदभवनात हा शपथविधी झाला. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख तसंच भारताचे प्रथम नागरिक असतात. याशिवाय तिन्ही दलांचे कमांडर इन चिफ असतात. तुम्हाला माहिती आहे का, देशाच्या राष्ट्रपतींना किती वेतन मिळतं. त्यांना राष्ट्रपती असताना कोणत्या सुविधा मिळतात आणि राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर कोणत्या सोयी सुविधा असतात? जाणून घ्या...

देशाच्या राष्ट्रपतींना सध्या प्रत्येक महिन्याला ५ लाख रुपये वेतन मिळते. राष्ट्रपतींना यावर कोणताही कर भरावा लागत नाही. याशिवाय इतर भत्तेही त्यांना दिले जातात. भारताचं राष्ट्रपती भवन हे जगातील सर्वात मोठं राष्ट्रपती भवन असून याठिकाणीच राष्ट्रपतींचा निवास असतो.

राष्ट्रपती भवन हे २ लाख चौरस फूट क्षेत्रफळ इतक्या जागेत असून तिथे ३४० खोल्या आहेत. जवळपास २०० लोकं तिथे काम करतात. राष्ट्रपतींचे निवासस्थान, कर्मचारी, पाहुणे, जेवण इत्यादी बाबींवर वर्षाला साधारणपणे २२.५ दक्षलक्ष रुपये खर्च होतो.

भारताच्या राष्ट्रपतींना आजीवन संपूर्णपणे मोफत उपचार आणि निवासस्थान मिळते. तसंच राष्ट्रपती असताना त्यांच्या सुरक्षेसाठी ८६ अंगरक्षक तैनात असतात. त्यांच्या ताफ्यात २५ वाहने असतात. राष्ट्रपतीं सानुकूल बिल्ट ब्लॅक मर्सिडीज बेंझ S600 (W221) पुलमन गार्डसाठी पात्र आहेत. शिवाय राष्ट्रपतींकडे अधिकृत भेटींसाठी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी एक लिमोझिन देखील आहे.

माजी राष्ट्रपतींना मिळणाऱ्या सुविधा
राष्ट्रपतींना निवृत्तीनंतरही अनेक सुविधा मिळतात. यामध्ये दरमहा दीड लाख रुपये पेन्शन दिली जाते. याशिवाय कर्मचाऱ्यांवर खर्चासाठी दर महिन्याला ६० हजार रुपये स्वतंत्र देण्यात येतात. आजीवन राहण्यासाठी एक बंगला दिला जातो. तसंच आजीवन ट्रेन किंवा विमानाने मोफत प्रवास आणि आयुष्यभर मोफत वाहनसुद्धा असते. माजी राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी सुरक्षा आणि दिल्ली पोलिसांचे दोन सचिव असतात.

IPL_Entry_Point