मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ९३ जागांसाठी होणार मतदान

Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं आज मतदान; ९३ जागांसाठी होणार मतदान

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 05, 2022 01:45 PM IST

Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज ५ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्ह्यातील तब्बल ९३ जागांवर हे मतदान होत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मतदान करण्याची शक्यता आहे.

Gujrat Election
Gujrat Election

Gujrat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल १४ जिल्ह्यातील ९३ जागांसाठी आज दुसऱ्या टप्यातील मतदान होणार आहे. तबल ६१ पक्षाचे ८३३ उमेदवारांचे भविष्य हे आज मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील मतदान करणार आहेत.

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्यासाठी बनासकांठा, पाटण, मेहसाणा, साबरकांठा, अरवली, गांधीनगर, अहमदाबाद, आनंद, खेडा, महिसागर, पंचमहाल, दाहोद, वडोदरा आणि छोटा उदेपूर या १४ जिल्ह्यातील हे ९३ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. २०१७ मध्ये भाजपने या ९३ जागांपैकी तब्बल ५१ जागांवर विजय मिळवला होता. तर कॉँग्रेसने ३९ जागांवर विजय मिळवला होता. मध्यगुजरातमध्ये भाजपने तब्बल ३७ जागा जिंकल्या होत्या. तर कॉँग्रेसने २२ जागा मिळवल्या होत्या. गुजरातमध्ये तब्बल १८२ जागा आहेत. सौराष्ट्र आणि कच्छ तसेच दक्षिण गुजरात येथील ८९ जागांसाठी पहिल्या टप्प्यात या आधी मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल ६३.३१ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या टप्यातील मंतदानासाठी देखील निवडणूक आयोग सज्ज झाले आहे. आज पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज नेते आज मतदान करणार आहेत.

आज होणाऱ्या मतदानात २.५१ कोटी नोंदणीकृत मतदार मतदान करण्यात आहेत. यातील १.२० कोटी मतदार हे पुरुष तर १.२२ कोटी मतदार या महिला आहेत. १८ टे १९ वर्षांचे तब्बल ५.९६ मतदार आहेत. निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यासाठी तब्बल १४ हजार ९७५ मतदान केंद्र बनवले आहेत. या साठी तब्बल १.१३ लाख कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आज तब्बल ३६ हजार ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा घाटलोडिया, भाजप नेते हार्दिक पटेल यांचा विरमगाम तसेच गांधीनगर दक्षिणचा समावेश असून जिथून भाजपचे अल्पेश ठाकोर निवडणूक लढवत आहेत. जिग्नेश मेवाणी हे बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि गुजरात विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखराम राठवा हे छोटा उदयपूर जिल्ह्यातील जेतपूरमधून उमेदवार आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या