मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Muzaffarpur fire : मुझफ्फरपूरमध्ये अग्नितांडव! चार बहिणी जिवंत जळाल्या; झोपेत काळाने घातला घाला

Muzaffarpur fire : मुझफ्फरपूरमध्ये अग्नितांडव! चार बहिणी जिवंत जळाल्या; झोपेत काळाने घातला घाला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 02, 2023 09:26 AM IST

four sister died in Muzaffarpur fire : बिहारच्या मुझफ्फरपूर येथे एका घराला आग लागण्याने झोपल्या असलेल्या चार बहीणीचा जळून करूण मृत्यू झाला. या घटनेत ६ जखमी झाले आहेत.

four sister died in Muzaffarpur fire
four sister died in Muzaffarpur fire (HT)

मुझफ्फरपूर: मुझफ्फरपूर येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या ठिकाणी रात्री एका घराला लागलेल्या भीषण आगीत झोपल्या असलेल्या चार बहिणींचा करुण मृत्यू झाला. या घटनेत घरातील ६ जण गंभीर जखमी झाले आहे. ही आग कशी लागली याचे कारण समजू शकले नाही. आग एवढी भीषण होती की घरात असलेल्यांना बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही.

Cyclone Mocha: 'मोचा' चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकणार; बंगालच्या उपसागरात वादळाचे केंद्र

बिहारमधील मुझफ्फरपूरमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. काल रात्री एका घराला लागलेल्या भीषण आगीत ४ बहीणींचा जळून मृत्यू झाला. सोनी (वय १२), शिवानी (वय ८), अमृता (वय ५), रीता (वय ३) अशी जळून मृत्यू झालेल्या बहीणींची नावे आहेत.

ही आग इतकी भीषण होती की मुलींना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही.  ही घटना मुझफ्फरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रामदयाळू जवळ घडली आहे. रात्री १ वाजण्याच्या सुमारास झोपडपट्टीला अचानक आग लागली. दरम्यान, झोपडीत गाढ झोपेत असलेल्या मुलींना आगीची घटना समजली नाही आणि चौघींचा झोपेतच जळून करूण मृत्यू झाला.

Pet Animal : आता पाळीव कुत्रे आणि मांजरांना रेल्वेतून नेणे होणार शक्य, ऑनलाईन बुक करता येणार तिकीट

या घटनेमुळे रडून रडून नातेवाइकांची केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. त्यांच्या चारही मुलीवर काळाने घाला घातला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते.  त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, आग भीषण असल्याने बचाव पथकाला अडचणी येत होत्या. काही वेळातच येथील पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी नागरिकांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी मुलींचे मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमार्टमसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

 

नरेश (पूर्ण नाव समजू शकले नाही) असे पीडिताचे नाव आहे. त्याचे संपूर्ण घर या घटनेत भस्मसात झाले. नरेशच्या घराला १ च्या सुमारास आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. ज्यात त्यांच्या चार मुली ठार झाल्या.

IPL_Entry_Point

विभाग