मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्यात मनीष सिसोदिया मुख्य आरोपी; CBI कडून गुन्हा दाखल

दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्यात मनीष सिसोदिया मुख्य आरोपी; CBI कडून गुन्हा दाखल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 19, 2022 10:56 PM IST

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याविरोधात सीबीआयनं मनीष सिसोदियांसोबत १५ आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये सिसोदियांना घोटाळ्यातील मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात आले आहे.

मनीष सिसोदिया
मनीष सिसोदिया

नवी दिल्ली - दिल्ली सरकारचं नवीन नवं मद्य धोरण चांगलेच अडचणीत आल्याचं दिसून येत आहे. दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह एकूण २१ ठिकाणी छापेमारी केली. जवळपास १२  तास सीबीआय सिसोदियांच्या घरी तपास करत होते. दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याविरोधात सीबीआयनं मनीष सिसोदियांसोबत १५ आरोपींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये सिसोदियांना घोटाळ्यातील मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात आले आहे.

दिल्ली सरकारच्या नव्या मद्य धोरणांचा तपास करताना सात राज्यात ३१ ठिकाणी छापेमारी केली आहे. यामध्ये त्यांना अनेक पुरावे मिळाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं सीबीआयच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे.

दिल्ली सरकारच्या एक्साईज पॉलिसीच्या विरोधात तपास करण्याची शिफारस नायब राज्यपालांनी केली होती. सिसोदिया यांनी गुन्हेगारी कट आणि खात्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोपही सीबीआयने त्यांच्यावर केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एएफआरमध्ये काही दारु कंपन्यांचाही समावेश आहे. त्यासोबत १५ जणांविरोधात आणि काही अज्ञात लोकांविरोधात सीबीआयनं गुन्हे दाखल केले आहेत.

सीबीआय कारवाईविरोधात सिसोदियांची प्रतिक्रिया -

सीबीआयचे स्वागत आहे. आम्ही प्रामाणिक आहोत. लाखो मुलांच्या भविष्य उभारणीचे काम आम्ही करत आहोत. आपल्या देशाचे हे दुर्देव आहे, की जो चांगले काम करतो त्याला असाच त्रास दिला जातो. याच कारणामुळे आपला देश प्रथम क्रमांकावर नाही,” असे ट्वीट करत मनीष सिसोदिया यांनी करत या कारवाईचा निषेध केला आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग