मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Fire: दिल्लीतील करमपुरा येथील कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल

Delhi Fire: दिल्लीतील करमपुरा येथील कारखान्याला भीषण आग, अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 13, 2023 09:25 AM IST

Delhi Fire Updates: दिल्लीतील करमपुरा परिसरातील एका कारखान्याला रात्री उशीरा आग लागल्याची घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत.

Mumbai Fire
Mumbai Fire

Delhi Fire: दिल्लीतील करमपुरा परिसरातील स्टेटस ए ब्लॉक या कारखान्याला रात्री उशिरा आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही. मात्र, आगीचे घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. या आगीत कोणतीही जीवितहान न झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही आग कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नसून शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग