मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Murder : शेजाऱ्यांच्या डीजे पार्टीला विरोध केल्याने गर्भवती महिलेची गोळ्या झाडून हत्या

Delhi Murder : शेजाऱ्यांच्या डीजे पार्टीला विरोध केल्याने गर्भवती महिलेची गोळ्या झाडून हत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 10, 2023 09:25 AM IST

Delhi Murder : दिल्ली येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारी मोठी गाणी लावून सुरू असलेल्या पार्टीत जाऊन आवाज कमी करण्यास सांगितल्याने शेजारी असणाऱ्या गर्भवती महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

crime news
crime news

नवी दिल्ली : दिल्ली येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. शेजारच्या घरात डिजेवर मोठी गाणी सुरू असल्याने ही गाणी हळू आवाजात वाजवण्यास सांगितल्याने एका ३० वर्षीय गर्भवती महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रंजू असे खून करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. मृत महिला ही आठ महिन्यांची गर्भवती होती. ३ एप्रिलला १२ च्या सुमारास समयपूर बदली येथे एका सोसायटीत मोठ्याने गाणी लावून पार्टी सुरू होती. गाण्यांचा मोठ्या आवाजाने शेजारी राहणाऱ्या रंजूला त्रास होत होता. रंजूने पार्टी सुरू असलेल्या घरी जाऊन त्यांना आवाज कमी करण्यास सांगितले. याचा राग आल्याने पार्टीतील दोन तरुणांनी महिलेवर गोळी झाडली. या घटनेत महिला ही गंभीर जखमी झाली. ही घटना घडताच पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घरी येऊन दोन आरोपींना अटक केली.

हरीश आणि अमित असे अटक करण्यात आलेल्या दोनआरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, "या घटनेसंदर्भात कॉलवर माहिती मिळाल्यानंतर, पोलिस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, जखमी महिलेला दिल्लीतील शालीमार बाग येथील मॅक्स हॉस्पिटल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. गुन्हे पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, जखमी महिलेच्या मानेवर बंदुकीची गोळी लागली होती. या घटनेत तिचा गर्भपात झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी एका प्रत्यक्षदर्शीचा जबाबही नोंदवला, जो जखमी महिलेचा मेहुणा आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, हरीश हा त्याच कॉलनीत समेपूर बदली भागात रस्त्याच्या पलीकडे राहतो. २ एप्रिल रोजी हरीशच्या मुलाचा "कुवा पूजन" कार्यक्रम होता. या कार्यक्रमात डीजे लावला होता. मोठ्याने गाणी वाजवण्यात येत होती. हा मोठा आवाज ऐकून रंजू बाल्कनीत येवून हरीशला डीजे बंद करायला सांगितला. मात्र, याचा राग आल्याने त्याने तिच्यावर बंदुकीतून गोळी झाडली.

पीडित मुलीच्या मेहुण्याच्या वक्तव्याच्या आधारे, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता खुनाचा आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीश आणि अमित या दोघांनाही अटक करण्यात आली आहे," असे पोलिसांनी सांगितले.

IPL_Entry_Point

विभाग