मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bomb Threat Iran Passenger Jet : इराणहून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्बची अफवा; भारतीय सुखोई विमानांनी दिली सुरक्षा

Bomb Threat Iran Passenger Jet : इराणहून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्बची अफवा; भारतीय सुखोई विमानांनी दिली सुरक्षा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Oct 03, 2022 01:50 PM IST

Bomb Threat Iran Passenger Jet : महान एयरलाइन्सच्या एका नागरी विमानात बॉम्ब असल्याची माहिती लाहौर एयर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) दिल्यावर खळबळ उडाली. हे विमान इराणयेथून चीनला जात होते. हे विमान भारतात दिल्ली किंवा जयपुर येथे लँड करण्याची परवानगी मागण्यात आली होती.

Bomb Threat Iran Passenger Jet
Bomb Threat Iran Passenger Jet

दिल्ली : इराण येथून चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याच्या माहितीने खळबळ उडाली. हे विमान भारतीय हवाई हद्दीतून उडत होते. यावेळी लाहौर एयर ट्रॅफिक कंट्रोलने या बाबत माहिती दिली. या विमानात बॉम्ब होता की नव्हता या बाबत माहिती मिळू शकलेली नाही. असे असले तरी सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आहेत. या विमानावर नजर ठेवली जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच भारतीय हवाई दलाच्या दोन सुखोई विमानांनी तातडीने उड्डाण घेत या विमानाला सुरक्षा दिली. दरम्यान हे विमान चीन येथे सुरक्षित लँड झाल्याची माहिती मिळत आहे.

तेहरान येथील विमानळावरून या विमानाने उड्डाण केले होते. महान एयरलाइन्सचे हे विमान लाहौर एयर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने बॉम्बने उडवण्यात येणार असल्याची माहिती भारतीय सुरक्षा यंत्रणांना दिली. हे विमान भारतात दिल्ली किंवा जयपूर येथे लँड केले जावे यासाठी परवानगी देखील मागण्यात आली होती. मात्र, ही परवानगी नाकारण्यात आली. सध्या हे विमान चीनी हवाई क्षेत्रात पोहचले असून काही ते सुरक्षित उतरल्याची माहिती मिळत आहे.

विमानात बॉम्ब असल्याची अफवा देखील असू शकते. लाहौर एटीसीने दिलेल्या महितीनंतर भारतीय हवाईदल अलर्ट झाले. ही घटना अशा वेळेला घडली जेव्हा राजस्थानच्या जोधपुरयेथे लाइट कॉम्बैट हेलीकॉप्टर म्हणचेच LCH हे वायुदलाल हस्तांतरित केले जात होते. या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वायुसेना प्रमुख एयर चीफ मार्शल वीआर चौधरी या सोबत अनेक मोठे अधिकारी देखील उपस्थित होते. फ्लाइट रडारवर २४ तासांच्या उड्डाणाची माहिती घेतली जात आहे. दिल्ली-जयपुर हवाई क्षेत्रात हे विमान आल्यावर विमानाची ऊंची ही कमी झाली होती. याच वेळी भारतीय हवाई दलाने कारवाई करण्यासाठी दोन सुखोई विमान तैनात केले होते.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग