मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: महिला अधिकारी नको म्हणत असतानाही डॉक्टरनं शूट केला 'तो' व्हिडिओ, व्हायरल होताच...

Viral Video: महिला अधिकारी नको म्हणत असतानाही डॉक्टरनं शूट केला 'तो' व्हिडिओ, व्हायरल होताच...

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 04, 2023 02:23 PM IST

Bihar Viral Video: बिहारमधील खगरियामधील महिला आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरच्या मसाजचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Viral Video
Viral Video

Female Health Officer Gives Face Massage to Doctor: बिहारमधील खगरियामधील एका महिला आरोग्य अधिकारी आणि पीएससी प्रभारीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला डॉक्टरच्या चेहऱ्याला मसाज करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानेतर सिव्हिल सर्जनने दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या व्हिडिओतील डॉक्टर रजेवर आहेत. तर, महिला हा व्हिडिओ व्हायरल करू नका, अशी विनंती करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओतील डॉक्टर आणि महिला दोघेही विवाहित आहेत. ज्यावेळी डॉक्टर हा व्हिडिओ काढत होता, तेव्हा महिला व्हिडिओ न बनवण्याची विनंती करत होती. परंतु, तरीही डॉक्टरने हा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ व्हायरल होताच खगरियाचे प्रभारी सिव्हिल सर्जन रामनारायण चौधरी या प्रकरणाची दखल घेतली. तसेच डॉक्टर आणि महिलेला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. येत्या तीन दिवसांत दोघांकडून उत्तरे मागितली आहेत. त्यानंतर दोघांवर विभागीय कारवाई करण्यात येणार आहे.

डॉक्टर आणि महिला आधीच विवाहित असल्याने लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघेही अत्यंत जबाबदार पदांवर असल्याने विभागासाठी ते लाजीरवाणे ठरणार आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि फोटो या दोघांच्या पदाच्या धोकादायक ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग