मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Rakesh Jhunjhunwala : नफा-तोट्याची अचूक जाण असलेला 'भारताचा वॉरेन बफे' हरपला; अचानक घेतली एक्झिट!

Rakesh Jhunjhunwala : नफा-तोट्याची अचूक जाण असलेला 'भारताचा वॉरेन बफे' हरपला; अचानक घेतली एक्झिट!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 14, 2022 10:00 AM IST

Rakesh Jhunjhunwala Pass Away : शेयर मार्केटमध्ये 'बिग बुल' अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचं आज सकाळी निधन झालं आहे.

Investor Rakesh Jhunjhunwala Pass Away
Investor Rakesh Jhunjhunwala Pass Away (HT)

Investor Rakesh Jhunjhunwala Pass Away : भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जाणारे गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं आहे. यशाच्या शिखरावर असताना झुनझुनवाला यांचं निधन झाल्यानं शेयर मार्केट क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ते ६२ वर्षांचे होते, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मालकीच्या 'अकासा एअर' या विमानसेवेचं उद्घाटन झालं होतं. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचं आज निधन झाल्याची माहिती समोर येत आहे.

शेयर मार्केटमध्ये 'बिग बुल' अशी होती ओळख…

गुंतवणुक क्षेत्रात राकेश झुनझुनवाला यांना बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे या नावानंही ओळखलं जात होतं. झुनझुनवाला ज्या स्टॉकमध्ये गुंतवणुक करतात, त्याची किंमत वाढते, असा शेयर मार्केटमधील आतापर्यंतचा ट्रेंड राहिलेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला होता. बाजारातील नफा आणि तोटा याची अचूक जाण झुनझुनवाला यांना असल्यानं त्यांनी खरेदी केलेले स्टॉक मालामाल होतात, असं म्हटलं जात होतं. झुनझुनवाला हे सीए असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यापाराच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय श्रीमंतांच्या यादीत झुनझुनवाला ४८ व्या क्रमांकावर होते.

दलाल स्ट्रीटचे निर्विवाद बादशाह...

राकेश झुनझुनवाला यांचा ५ जुलै १९६० रोजी मुंबईत जन्म झाला होता. त्यांचे वडिल आयकर विभागात कामाला होते, सेडनहॅम कॉलेजमधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी चार्टर्ड अकाऊंटंटसाठी नंबर लावला होता. त्यानंतर त्यांचं लग्न गुंतवणूकदार असलेल्या रेखा झुनझुनवाला यांच्याशी झाला होता.

झुनझुनवाला यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी दलाल स्ट्रीटकडं काम करण्याचा निर्णय घेतला होता. १९८५ साली त्यांनी पाच हजार रुपयांपासून गुंतवणुक करायला सुरुवात केली होती. आता त्या पाच हजारांच्या भांडवलाची किंमत ११ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.

'हाय-रिस्क' गुंतवणुकीची सवय होती...

कोणत्याही व्यक्तीला शेयर मार्केटमध्ये गुंतवणुक करायची इच्छा असेल तर त्याच्याकडे रिस्क घेण्याची तयारी असायला हवी. झुनझुनवाला यांनी अनेकवेळा गुंतवणुक करताना हाय रिस्क घेतली होती. त्याचा त्यांना मोठा फायदा झाला होता. १९८६ साली त्यांनी टाटा टी चे पाच हजार शेयर्स ४३ रुपये दराने खरेदी केले आणि तीन महिन्यांतच त्यांनी हे सर्व शेयर तब्बल १४३ रुपये प्रतिशेयर दराने विकले होते. त्यातून त्यांनी जवळपास तिनपट नफा कमावला होता. अशाच पद्धतीनं हायरिस्क गुंतवणुक करण्यात राकेश झुनझुनवाला माहिर होते, काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या गुंतवणुक क्षेत्राला आणि व्यापार क्षेत्राचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता, त्यातच आता त्यांचं निधन झाल्यानं नेमक्या यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी एक्झिट घेतल्याचं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग