मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amravati Murder: उमेश कोल्हेंचा खून करणारा रवी राणांचा कार्यकर्ता: यशोमती ठाकूर

Amravati Murder: उमेश कोल्हेंचा खून करणारा रवी राणांचा कार्यकर्ता: यशोमती ठाकूर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 12, 2022 09:43 AM IST

Umesh Kolhe Killing In Amravati: सध्या देशभरात चर्चेत असलेल्या अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्येवरून माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि बडनेऱ्याचे आमदार रवि राणा यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असल्यानं अमरावती जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे.

Umesh Kolhe Killing In Amravati
Umesh Kolhe Killing In Amravati (HT)

Umesh Kolhe Murder Case Amravati: अमरावतीमधील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करणारा सूत्रधार आरोपी इरफान खान हा आमदार रवि राणा यांचा कार्यकर्ता असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणांवर केला आहे. नुपुर शर्मा यांच्या पैगंबरांवर आक्षेपार्ह टिप्पणीनंतर देशभरातील काही राज्यांमध्ये झालेल्या हत्या प्रकरणांतील आरोपींची लिंक भाजपशी सापडत असल्याचा दावा करत त्यांनी या हत्येचं कनेक्शन व आरोपींचा संबंध थेट राणा दाम्पत्याशी जोडला आहे.

'खासदारांनी २७ तारखेला पत्र दिलं आणि २८ तारखेला उदयपूरची घटना घडली, अमरावती आणि उदयपूरची घटना ही पूर्वनियोजित कट आहे, राणा दाम्पत्यानं आतापर्यंत हनुमान चालिसा वाचली, आता अजून अमरावतीला किती गढूळ करणार आहात?, भाजप अमरावतीला प्रयोगशाळा करणार असेल तर हे आम्ही कधीही होऊ देणार नाही, त्यामुळं या हत्या प्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. '

हत्येचा सूत्रधार कॉंग्रेसचा कार्यकर्ता- रवि राणा

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी हा आपला नाही तर कॉंग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं प्रत्यूत्तर दिलं आहे. '२१ जूनला उमेश कोल्हे यांची हत्या झाली आणि २ जुलैपर्यंत पोलीस एका दरोड्याच्या प्रकरणाचा तपास करत होती, ते करण्यासाठी त्यांना मंत्री ठाकूर यांनी आदेश दिला होता', असा धक्कादायक आरोप रवि राणा यांनी ठाकूर यांच्यावर केला.

दरम्यान आतापर्यंत उमेश कोल्हे यांच्या प्रकरणात ठाकूर आणि राणा यांच्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनीही भूमिका घेतली आहे. त्यांनी ठाकूर यांच्यावर आरोप करताना म्हटलंय की '१२ नोव्हेंबरला ४० हजार मुस्लिमांचा मोर्चा झाला, तेव्हा पालकमंत्री ठाकूर यांनी केवळ ४० पोलीस दिले, या मोर्चातील लोकांनी लुटमार केली, मारहाण केली, तेव्हा त्यांनी कोणता शोध घेतला, त्यामागे कुणाचा हात होता?', असा प्रश्न खासदार बोंडे यांनी ठाकूर यांना विचारत जो कोणी हिंदूंची कत्तल करत असेल त्याला फासावर लटकवलंच पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या