मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Narayan Rane : जी २० परिषदेच्या लोगोमध्ये कमळ का?; नारायण राणे यांनी सांगितलं!

Narayan Rane : जी २० परिषदेच्या लोगोमध्ये कमळ का?; नारायण राणे यांनी सांगितलं!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 16, 2023 04:55 PM IST

Narayan Rane in G 20 summit : पुण्यात आज पासून जी २० परिषद सुरू झाली आहे. या बैठकीचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी परिषदेच्या कमळ लोगोवर भाष्य केले आहे.

 Narayan Rane
Narayan Rane (HT_PRINT)

पुणे : 'जी -२० परिषद मधील कमळ हे भाजपचे नसून ते भारताचे आहे. शाश्वत विकास म्हणजे कमळ आहे. कमळ म्हणजे भाजप नाही, जो भाजप मध्ये येईल, त्याचा शाश्वत विकास होईल. भाजप शशवत विकास करतो,' असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

जी - २० देशांची पुण्यात दोन दिवसीय बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने ते बैठीकास उपस्थित राहिल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख उपस्थित होते.

राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने ही परिषद देशातील विविध शहरात होत आहे. आंतरराष्ट्रीय ही संस्था असून त्याचे परिषदेचे उद्घाटन करण्याचा मान मला मिळाला हे माझे सौभग्य आहे. भारत एक प्रगतशील देश असून सन २०१४, मध्ये भारत जगात दहाव्या क्रमांकावर होता तो आत्ता पाचव्या क्रमांकावर आला आहे. प्रधानमंत्री यांच्या पुढाकाराने आपण प्रगती करत आहे. अमेरिका. चीन, जपान, जर्मनी, यानंतर आपण पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. आपल्याला विश्वास आहे प्रधानमंत्री जे बोलतात ते करतात त्यामुळे आपण आर्थिक महासत्ता होऊ. ५० टक्के लोकसंख्या ही शहरात राहत असून त्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजे यादृष्टीने परिषद मध्ये चर्चा होणार आहे. पुणे, मुंबई अशी शहरे गुंतवणुकीस आकर्षित करत आहे. भारत प्रगती करत असून त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे.

सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग राज्यात येण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार सर्व योजना राबवण्यासाठी इच्छुक आहे. प्रत्येक जिल्हा नुसार धोरण ठरविण्यात येत आहे.देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाल्यास सामान्य नारिकाचा ही जी २० परिषद मधून विकास होईल. अमेरिकाची २० ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे. भारताची सध्या साडेतीन ट्रिलियन असून ती पाच ट्रिलियन करण्याचा प्रयत्न आहे, असेही राणे म्हणाले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जी 20 परिषदे बाबत माहिती दिल्यावर, प्रसार माध्यमांच्या एका प्रतिनिधीने प्रश्न विचारण्या पूर्वी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेछा देताच नारायण राणे म्हणाले, मी नेहमीच गोड बोलतो.असे म्हणताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

 

IPL_Entry_Point

विभाग