मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Supriya Sule: पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे; नंतर जे काही घडलं ते पाहून थक्क व्हाल!

Supriya Sule: पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे; नंतर जे काही घडलं ते पाहून थक्क व्हाल!

Oct 20, 2022 01:56 PM IST

Supriya Sule caught in Pune Traffic : पुण्यात वाहतूककोंडी हा गंभीर प्रश्न झाला आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना तर होतोच त्याप्रमाणे राजकीय पुढाऱ्यांनाही होतो. बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना देखील या वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे.

सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूककोंडीत
सुप्रिया सुळे अडकल्या वाहतूककोंडीत

पुणे : पुण्यात होणारी वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीचा सामना हा सर्वसामान्य नागरिक नेहमीच करत असतात. मात्र, आता लोकप्रतिनिधींना देखील याचा फटका बसू लागला आहे. पुण्यातील हडपसर म्हणजे वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट असून हा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या वाहतूक कोंडीत आज बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील फसल्या. वाहतूक ही पुढे जात नसल्याने त्यांनी थेट गाडीतून उतरून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याच्या प्रयत्न केला. स्वत: खासदार वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पुढे आल्याने पोलिसांची देखील तारांबळ उडाली. सुप्रिया सुळे या वाहतुकीचे नियोजन करत असतानाचा व्हिडिओ समाज मध्यमांवर व्हायरल झाला आहे.

बारामती येथून सासवड मार्गे सुप्रिया सुळे या पुण्यात येत होत्या. यावेळी त्यांची गाडी ही फुरसुंगी येथील उड्डाणपुलावर असलेल्या वाहतूककोंडीत अडकली. त्यांना तातडीने पुण्यात एका बैठकीसाठी यायचे असल्याने त्यांनी आपल्या गाडीतून उतरत वाहतूक कोंडी सोडण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. या मार्गावर असलेले खड्डे आणि नादुरुस्त रासत्यांमुळे वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत येथील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी या निवेदानाला काचऱ्याची टोपली दाखवली. रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. एखादा मंत्री, आमदार, खासदार या रस्त्याने जाताना या कोंडीत अडकला तर त्यासाठी ही वाहतूक तातडीने सुरळीत केली जाईल. पण सर्वसामान्य नागरिक, वाहन चालक मात्र, रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागले आहेत.

या मार्गावरील कोंडीबाबत स्थानिक नागरिक वारंवार आंदोलन करतात. मात्र, असे असूनही कुठल्याच उपाययोजना कोंडी सोडवण्यासाठी करण्यात येत नाहीत. स्वत: सुप्रिया सुळे या कोंडीत अडकल्याने आता त्या काय करतील या कडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहेत सोलापूर रस्त्यावर गेल्या तीन दिवसापासून रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र ते पाणी काढण्यात प्रशासनाला यश येत नाही. त्यामुळे येथील वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर