मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : अजित पवार यांच्या अडचणी वाढणार? ईडी चौकशीची शक्यता

Ajit Pawar : अजित पवार यांच्या अडचणी वाढणार? ईडी चौकशीची शक्यता

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Oct 17, 2022 11:35 AM IST

Ajit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी चौकशी होऊ शकते. याआधी या प्रकरणाचा तपास बंद केला होता.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (पीटीआय)

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी चौकशी होऊ शकते. याआधी या प्रकरणाचा तपास बंद केला होता. मात्र पुन्हा या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी होत आहे. यामुळे अजित पवार यांच्यासह ७६ संचालकांची पुन्हा चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

आर्थिक गुन्हे विभागाकडून याआधी सांगण्यात आलं होतं की, अजित पवार आणि इतर ७६ जणांविरोधात कारवाईसाठी ठोस पुरावे आढळले नाहीत. त्याबाबत आर्थिक गुन्हे विभागाने अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र मूळ तक्रारदाराने निषेध याचिका दाखल केली आणि ईडी अहवालाच्या आधारे पुढील तपास सुरू केला असल्याचं म्हटलं.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी तक्रार दाखल केलेली. त्यानंतर अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. २५ हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचा दावा सुरिंदर अरोरा यांनी याचिकेत केला होता.

शिखर बँकेतून २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केली गेली असा आरोप सुरिंदर अरोरा यांनी केला. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेकडून संचलाक मंडळ बरखास्तीची कारवाई करण्यात आली होती. तसंच चौकशीचे आदेश आरबीआयने दिले होते.

मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार आणि इतर नेत्यांविरोधात ठोस पुरावे सापडले नसल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला होता. या अहवालाविरोधात सुरिंदर अरोरा यांनी निषेध याचिका दाखल केली होती. ईडीने पुरावे असल्याचा अहवाल सादर केल्यानंतर पोलिसांनी या याचिकेसह अहवालाला विरोध केला होता.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग