मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  "लावा तपास एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी मी लावले असतील तर..."; भास्कर जाधवांचे खुले आव्हान

"लावा तपास एकनाथ शिंदेंना १०० काय ५ फोन जरी मी लावले असतील तर..."; भास्कर जाधवांचे खुले आव्हान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 28, 2023 05:43 PM IST

Bhaskar Jadhav criticized mohit Kamboj : आमदार भास्कर जाधव म्हणाले की, मी तत्वासाठी लढतो. जर मोहित कंबोज १०० बापांची पैदास नसेल तर त्याने एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा.

भास्कर जाधवांचे खुले आव्हान
भास्कर जाधवांचे खुले आव्हान

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच महिन्यापूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व बंड करून उद्धव ठाकरेंविरोधात पवित्रा घेतला होता तेव्हा शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी भास्कर जाधवही (Bhaskar Jadhav) शिंदे यांच्यासोबत जाणार होते. त्यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी विमानाचे तिकीटही बुक केले होते. आपल्याला शिंदे गटात घेण्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांना १०० फोन केले होते. मात्र आमदारांच्या विरोधामुळे जाधवांना शिंदे गटात सामील करून घेतले नाही, असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज (mohit Kamboj) यांनी केला होता. यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही कंभोज यांना थेट आव्हान दिले आहे. 

आपल्यावर होत असलेल्या आरोपांबाबत आमदार भास्कर जाधव म्हणाले की, मी तत्वासाठी लढतो. जर मोहित कंबोज १०० बापांची पैदास नसेल तर त्याने एकतरी आरोप सिद्ध करून दाखवावा. सुरुवातच झाली असेल देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे सत्ता, पैसा, तपास यंत्रणा आहेत. त्यामुळे अशी यंत्रणा लावा जर मी शिंदे यांना जर १०० काय ५ कॉल जरी केले असतील तर मी माझ्या राजकीय जीवनातून मुक्त होईन, असं त्यांनी म्हटलं. मी तत्त्वासाठी, ध्येयासाठी लढतो. मी सामान्य माणूस आहे. 

भास्कर जाधव म्हणाले की, सर्वांना माहीत आहे की, मी कुणाच्या दरवाजात राजकारणासाठी उभे राहिलो नाही. मोहित कंबोजचा बोलवता धनी वेगळाच आहे आणि तो आहे अनाजीपंत.  मी  अनाजीपंतांना इतकेच सांगतो की, तुम्ही राजकारणाचे वातावरण बिघडवले आहे. महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार संपवायला निघाला आहात. परंतु माझ्यासारखे भास्कर जाधव १०० उभे राहतील. मी सामान्य माणूस आहे. मोहित कंबोज, अनाजीपंत यांनी एक आरोप सिद्ध करून दाखवाव असं प्रतिआव्हान भास्कर जाधव यांनी दिले आहे. 

IPL_Entry_Point