मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे-फडणवीस सरकार आता बॉलीवूडवर नियंत्रण आणणार; लवकरच नियमावली लागू करणार

शिंदे-फडणवीस सरकार आता बॉलीवूडवर नियंत्रण आणणार; लवकरच नियमावली लागू करणार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 15, 2023 11:48 PM IST

Bollywood sop : बॉलिवूडसह मनोरंजन क्षेत्रावर राज्य सरकार नियंत्रण आणणार आहे.यासाठी लवकरच एक नियमावली जारी केली जाणार आहे.

शिंदे-फडणवीस सरकार
शिंदे-फडणवीस सरकार

मुंबई – बॉलिवूडसह मनोरंजन क्षेत्रातील निर्माते व अन्य कलाकारांच्या मनमानीला आता राज्य सरकारकडून चाप लावला जाणार आहे. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार आता नवीन नियमावली आणण्याच्या विचारात आहे. चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या कलाकार आणि कामगारांसहित निर्माते व दिग्दर्शक यांसाठी एक नवीन नियमावली सरकारने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये कलाकार व कामगारांचे वेतन कायद्यानुसार समान काम समान वेतन द्यावे लागणार आहे. ते न देणाऱ्या निर्माते व कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

या एसओपीच्या मार्फत सरकार बॉलीवूडवर व मनोरंजन विश्वावर नियंत्रण आणणार आहे. बॉलीवूड मधील कामगार, कलाकार व निर्मात्यांसाठी नवीन नियमावली (एसओपी) तयार करण्यात येणार आहे. चित्रपट निर्मात्यांवर कामगार व कलाकारांची जबाबदारी असेल. चित्रपट,  मालिका,  जाहिराती आणि वेब सिरीज यांना एसओपी लागू करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील कामगार व कलाकारांचे शोषण थांबवण्यासाठी एसओपी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यात किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याचे बंधनकारक असेल. 

बॉलीवूडसह मनोरंजन क्षेत्रात अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते. कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळत नाही, त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णायानंतर यापुढे कलाकार व कामगारांचे वेतन कायद्यानुसार द्यावे लागणार आहे.  ते न देणाऱ्या निर्माते व कंत्राटदारांवर कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे नव्या नियमावलीत कलाकार व कामगारांनाही अचानक काम बंद करून निर्माते व दिग्दर्शकांना वेठीस धरता येणार नाही. महत्त्वाचे म्हणजे कलाकार व कामगारांना कोणतीही समस्या असल्यास तक्रार करण्यासाठी एक नवे पोर्टल तयार करण्यात येणार आहे.  या पोर्टलवर चित्रपट सृष्टीत उपलब्ध असलेल्या कामाची माहितीही कलाकार व कामगारांना मिळणार आहे.

IPL_Entry_Point