मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक.. शेजाऱ्यांसोबतच्या वादातून १० वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून हत्या, पालघरमधील घटना

धक्कादायक.. शेजाऱ्यांसोबतच्या वादातून १० वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून हत्या, पालघरमधील घटना

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 02, 2023 11:33 PM IST

दहा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात घडली.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

Palghar Rape News :  कुटूंबीयांसोबत असलेल्या वादातून शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने दहा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात घडली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी रमेश दुबळा (वय ४५) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

आरोपी रमेश दुबळा याचे मुलीच्या घरच्यांसोबत भांडण होते. या वादातूनच त्याने हे भयंकर कृत्य केले. बुधवारी मृत मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिला आपल्या गाडीवरून नेले होते.  आरोपीने मुलीला घरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर  अत्याचार केला आणि तिची हत्या केली. रात्री झाल्यानंतरही मुलगी परत न आल्याने तिच्या आई-वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तलासरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक व्यक्ती मुलीला घेऊन जात असताना दिसला.  चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती मुलीच्या घराशेजारीच राहणारी असल्याचे समोर आले. दुबळा याच्याविरुद्ध तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. 

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या केली असल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

IPL_Entry_Point