मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दंगल भडकावली; भाजप खासदाराचा गंभीर आरोप

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दंगल भडकावली; भाजप खासदाराचा गंभीर आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Apr 02, 2023 04:26 PM IST

Sambhajinagar Violence : हिंसाचारातील आरोपींचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत, त्यांना राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांची फूस होती, याचीही चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

BJP MP Anil Bonde On Sambhajinagar Violence
BJP MP Anil Bonde On Sambhajinagar Violence (HT)

BJP MP Anil Bonde On Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजीनगरमधील दंगलीतील आरोपींना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची फूस होती, असा खळबळजनक आरोप भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यामुळं अशांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असून हिंसाचारातील प्रमुख आरोपींना राष्ट्रवादीच्या नेत्यांची फूस होती, त्यामुळं या प्रकरणाची तातडीनं चौकशी करायला हवी, अशी मागणीही खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. संभाजीनगर येथील हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १२ आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात असतानाच आता भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आल्यामुळं यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.

माध्यमांशी बोलताना भाजपा खासदार अनिल बोंडे म्हणाले की, संभाजीनगर येथील हिंसाचारातील प्रमुख आरोपी रियाजुद्दीन आमि कदीर मौलाना यांचे फोन कॉल्स तपासले पाहिजेत. त्यांना राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याची फूस होती?, याचाही शोध घ्यायला हवा, असं म्हणत अनिल बोंडे यांनी थेट राष्ट्रवादीवर दंगल भडकावल्याचा आरोप केला आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आल्यानंतर शहरात अशांततेचे प्रयत्न केले जात असल्याचंही बोंडे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीच्या कदीर मौलाना यांना निवडणूक लढवायची आहे. त्याचा मुलगा रियाजुद्दीन हा नेमका त्याच दिवशी भांडण करतो. त्यानंतर संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण होते. ते मंदिरात आसऱ्याला जातात. त्यानंतर तिथं जाळपोळ सुरू होते. हे सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांचं कारस्थान आहे. परंतु दंगलीच्या या कटामागे राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा हात असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला आहे. संभाजीनगर येथे हिंसाचार झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत, कायदा व सुव्यस्थेवर आरोप करण्यासाठी त्यांना दंगल भडकवावी लागते, असाही आरोप बोंडे यांनी केला आहे.

IPL_Entry_Point