मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद !

Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद !

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 18, 2023 08:39 PM IST

Pune water supply : बुधवारी (१९ एप्रिल)पुणे शहरातील अनेक भागात दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

Pune water Supply:  पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. ऐन उन्हाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट उभे राहिले आहे. १९ एप्रिल रोजी पुण्यातील अनेक परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पुणेकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. 

बुधवारी (१९ एप्रिल) पुणे शहरातील अनेक भागात दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक पुणेकरांवर पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आधीपासूनच पाण्याची टंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शहरी भागात कमी प्रमाणात तरी पाणीपुरवठा केला जात असला तरी ग्रामीण भागात परिस्थिती काहीशी बिकट आहे. 

छावणी पाणीपुरवठा केंद्रांतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीची देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू असल्याने बुधवारी (१९ एप्रिल) हडपसर परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गुरुवारपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

कोणत्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद?

रामटेकडी औद्योगिक क्षेत्र, सय्यद नगर, हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, राम नगर, आनंद नगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गणगले नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोपूर रोड. डावी बाजू, केशवनगर मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बीटी कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरिएंट गार्डन, साडेसातरा नळी, मोहम्मद वाडी रोडची संपूर्ण उजवी बाजू, संपूर्ण हांडेवाडी रोड, संपूर्ण फुरसुंगी आणि उरुळी देवघरची, मंतरवाडी या परिसरात पाठीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग