Nagpur crime : लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवला, केला आत्महत्येचा बनाव-nagpur crime news live in partner murder and hung dead body on tree ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur crime : लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवला, केला आत्महत्येचा बनाव

Nagpur crime : लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवला, केला आत्महत्येचा बनाव

Mar 28, 2024 08:24 PM IST

Nagpur Crime News : एका महिलेने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र ही आत्महत्या नसून प्रियकराने तिची गळा आवळून हत्या करत मृतदेह झाडाला लटकवला असल्याचे समोर आले आहे.

लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवला
लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेह झाडाला लटकवला

चारित्र्याच्या संशयातून लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून मृतदेह सीताफळाच्या झाडाला लडकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रियकराने तरुणीची हत्या करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ही आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र शवविच्छेदन अहवालात ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाच्या मुसक्या आवळल्या. गंगाधर अर्जुन घरडे (४८, रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तर नीतू (वय ३४) असे मृत महिलेचे नाव आहे.

जरीपटका परिसरात २ मार्च रोजी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. मात्र पोस्ट मार्टममध्ये प्रियकराचे पितळ उघडं पडलं व गळा आवळून हत्या आणि मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचं अहवालातून समोर आलं. संशयातून पोलिसांनी गंगाधरला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान त्यानं आपला गुन्हा कबूल केला. 

गंगाधर रंगकाम करतो. पेंटिंगचे काम करतो. १ मार्चच्या रात्री गंगाधरने त्याची प्रेयसी नीतूचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर रात्रीच्या अंधारातच तिचा मृतदेह घरासमोरील सीताफळाच्या झाडाला लटकवला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसात नीतूने आत्महत्या केल्याची वर्दी दिली. 

नीतूच्या कुटूंबीयांनी सांगितले की, तिने आधी लग्न झाले होते तसेच तिला पहिल्या पतीपासून दोन मुली होत्या. २०१७ पासून ती पतीपासून वेगळी रहात होती. ती काम करून उदरनिर्वाह चालवत होती. २०१९ मध्ये तिने गंगाधरशी लग्न करत असल्याचे कुटुंबीयांना सांगून त्यांच्यासोबत राहू लागली. 

काही दिवसानंतर नीतूने कुटुंबीयांना सांगितले की, गंगाधर आधीपासूनच विवाहित असून त्याला दोन मुलीही आहेत. तसेच तो दररोज दारूच्या नशेत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याची माहिती दिली होती.

विभाग