मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai local Mega Block : मुंबईत रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Mumbai local Mega Block : मुंबईत रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 03, 2023 08:21 PM IST

Mumbai Mega Block : मध्य रेल्वे रविवार ५ मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेणार आहे.

Mumbai local Mega Block
Mumbai local Mega Block

Mumbai Local Train Mega Block Update : मुंबई लोकल ट्रेनची सेवा रविवारी (५ मार्च) काही काळासाठी विस्कळीत होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य आणि हार्बर मार्गावर इंजीनिअरिंग व दुरुस्ती कामांसाठी रविवारीमेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजल्यापासून मध्य मार्गावरील डाऊन व अप तसेच स्लो व फास्ट ट्रकवरील वाहतूक दुपारपर्यंत बंद असणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या मुंबईकरांनी लोकल मेगाब्लॉकचे टाईमटेबल बघूनच घराबाहेर पडावे.

मध्य रेल्वे रविवार ५ मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेणार आहे.

ठाणे-कल्याण ५वी आणि ६वी लाईन सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत अप मेल आणि डाउन मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायवर्जन -

१२१२६ पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत-कल्याण मार्गे वळवली जाईल आणि निर्धारित वेळेच्या १०-१५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

सर्व अप आणि डाउन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप फास्ट लाईन आणि डाउन फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १० ते १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

शॉर्ट टर्मिनेशन मेमू सेवा -

वसई रोड येथून सकाळी ०९.५० वाजता दिवा साठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

दिवा येथून सकाळी ११.३० वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून (शॉर्ट ओरीजनेट) सकाळी ११.४५ वाजता सुटेल.

कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल - वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

 

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना त्यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

 

IPL_Entry_Point