मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai threat call : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Mumbai threat call : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा सतर्क

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 07, 2023 01:43 PM IST

Mumbai Airport Gets Threat Call: इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेने मंगळवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport

Chhatrapati Shivaji Maharaj International Airport: मुंबईमध्ये धमकीचे सत्र सुरुच आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील धीरुभाई अंबानी शाळा उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकून महिनाही उलटला नाही, तोच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेकडून धमकीचा फोन आल्याचे सांगितले जात असून सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मुंबईतील छत्रपत्री शिवाजी महाराज विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची फोन करून धमकी देण्यात आली. इरफान अहमद शेख असे फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो इंडियन मुजाहिद्दीन नावाच्या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचेही त्याने म्हटले आहे.यानंतर त्वरीत मुंबई पोलिसांना याची माहिती देण्यात आला.

याप्रकरणी सहारा पोलीस ठाण्यात आयपीसी कलम ५०५ (१) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.तसेच मुंबई विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग