मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur News : शाळेत जाण्यासाठी आई रागावली; मुलीने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने नागपूर हादरले

Nagpur News : शाळेत जाण्यासाठी आई रागावली; मुलीने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाने नागपूर हादरले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 27, 2023 02:16 PM IST

Nagpur News : नागपूर येथे आईने शाळेत जाण्याच्या कारणावरून रागावल्याने एका नवीत असलेल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.

नागपूर क्राइम
नागपूर क्राइम (HT_PRINT)

नागपूर : सध्या लहान मुलांमधील सहनशिलता ही कमी होऊ लागली आहे. छोट्या छोट्या करणावरून आयुष्य संपवण्याचे निर्णय मुले घेऊ लागली आहेत. अशाच एका घटलेने नागपूर शहर हादरले आहे. आईने शाळेत जाण्याच्या कारणावरून रागवल्याने एका नवीत असलेल्या मुलीने आत्महत्या केली आहे. ही घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

नंदिनी महेश लांजेवार (१५) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. नंदिनी हिला २१ फेब्रुवारी रोजी तिच्या आईने तिला शाळेत जाण्याच्या मुद्द्यावरून रागावले. तसेच परीक्षा जवळ आली असल्याने अभ्यास करण्याबाबत सांगितले. या कारणावरून नंदिनी हिला राग आला. तिने रागाच्या भरात दुपारी १ च्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. यानंतर तिची प्रकृती ही खराब झाली. तिने या बाबत आईवडिलांना सांगितल्यावर त्यांना जबर धक्का बसला. 

त्यांनी तिला तातडीने दवाखान्यात भरती केले. गेल्या चार दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, रविवारी रात्री २.१० वाजता तिची प्राणज्योत मालवली. तिला एक लहान बहीण असून ती देखील मानसिक धक्क्यात आले. तिच्या वडिलांच्या सूचनेवरून कळमना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point

विभाग