मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shivsena Vs Shinde: 'शिवसेनेनं अडीच वर्षात पेरलेलं, ते आता उगवतंय', प्रभादेवी राड्यावर मनसेचा टोला

Shivsena Vs Shinde: 'शिवसेनेनं अडीच वर्षात पेरलेलं, ते आता उगवतंय', प्रभादेवी राड्यावर मनसेचा टोला

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 11, 2022 11:55 AM IST

Shivsena Vs Shinde: गणेश विसर्जनावेळी झालेल्या वादानंतर काल मध्यरात्री प्रभादेवीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिंदे गटात जोरदार वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (PTI)

Shivsena Vs Shinde: कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झाला. लाडक्या गणरायाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत निरोप देण्यात आला. दरम्यान, मुंबईत प्रभादेवीत एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेच्या गटात जोरदार राडा झाला. या प्रकरणावरून आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतलं आहे.

गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यामध्ये वाद झाला. यावेळी झालेल्या बाचाबाचीत आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी म्याँव म्याँव म्हणत शिवसेनेवर टीका केली. अखेर वाद वाढल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्री हा वाद वाढला. तेव्हा आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या सुनिल शिंदे यांनी केला. पण वाद कौटुंबिक असल्याचं म्हणत आमदार सदा सरवणकर यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गोळीबार केल्याचे आरोपही फेटाळून लावले.

आता या सगळ्या प्रकरणात मनसेने उडी घेतली असून शिवसेनेला टोला लगावला. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, दादर, माहिम, प्रभादेवी हे सुसंस्कृत असे मतदारसंघ आहेत. तसंच अशा प्रकारे हाणामारी करायला हे बिहार राज्य नाहीय. याप्रकरणी पोलिसांनी योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केलीय.

शिवसेनेकडून अडीच वर्षांत जे पेरण्यात आलंय तेच आता उगवत आहे. अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केस टाकल्यात, लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केलात. माझ्यावर, संतोष धुरीवर खोटी केस टाकलीत. आता तुम्ही जे पेरलंय ते उगवतंय असं म्हणत संदीप देशपांडे यांनी टोला लगावला.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या