मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Fire : ठाण्यात अग्नितांडव.. सिने वंडर मॉलजवळील इमारतीला भीषण आग, पाहा VIDEO

Thane Fire : ठाण्यात अग्नितांडव.. सिने वंडर मॉलजवळील इमारतीला भीषण आग, पाहा VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 18, 2023 10:51 PM IST

cine wonder mall fire : ठाण्यातील सिने वंडर मॉलजवळील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे.

 ठाण्यात अग्नितांडव..
ठाण्यात अग्नितांडव..

Thane wonder mall Fire : ठाण्यातील सिने वंडर मॉलजवळील एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे घोडबंदर रोडवर आकाशात आग व धुराचे मोठे लोळ दिसून येत आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे. आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ठाणे पश्चिम भागातील सिने वंडर मॉल व कोरियन बिझनेस पार्क, कापूरबावडी या ठिकाणी आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान, फायर वाहन, रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह दाखल झाले. घटनास्थळी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

इमारतीला लागलेली आग इतकी भीषण आहे की, इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या आहे. इमारतीतून अनेक स्फोटांचेही आवाज ऐकू येत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग