मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Maharashtra News 14 September 2022 Live Updates Marathi Breaking News

Nana Patole

Marathi News 14 September 2022 Live: ही तर महाराष्ट्राशी बेईमानी; पटोले यांचा शिंदे सरकारवर घणाघात

Daily News Live Updates in Marathi: महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हे अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालतो हे स्पष्ट झाल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.

Wed, 14 Sep 202203:26 PM IST

Bihar Politics : नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात गुप्त भेट; राजकीय चर्चांना उधान

Bihar Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडून राजदसोबत युती केल्यानंतर पहिल्यांदाच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. त्यांनी पाटण्यात गुप्त भेट घेतली असून त्याचा तपशील अजून बाहेर आलेला नाही. त्यामुळं आता राजकीय चर्चांना उधान आलं आहे.

Wed, 14 Sep 202201:13 PM IST

Mumbai Trans Harbour Link: मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कामाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी डिसेंबरपूर्वी हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यामाध्यमातून रायगड जिल्ह्यातील चिर्ले जवळील पेण, पोयनाड परिसरात ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. लॉजिस्टिक्स पार्क, टाऊनशिप आणि रोजगार निर्मिती या तीन बाबींवर लक्ष केंद्रित केले जाणार असून त्यामाध्यमातून याभागाचा सूनियोजितपणे विकास होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

Wed, 14 Sep 202212:09 PM IST

BCCI वर सौरव गांगुली आणि जय शहा यांचं वर्चस्व कायम; कोर्टाचा मोठा निर्णय

bcci president and secretary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) बोर्डातील प्रस्तावित बदलांना सुप्रीम कोर्टानं हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळं आता बीसीसीआयचे चेयरमन तथा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि सचिव जय अमित शहा यांना त्यांच्या पदांचा कार्यकालात वाढ करता येणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आता बोर्ड पदाधिकाऱ्यांच्या कार्यकालात तीन वर्षांची वाढ करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

Wed, 14 Sep 202209:34 AM IST

Nana Patole on Vedanta Project: ही तर महाराष्ट्राशी बेईमानी; नाना पटोले यांचा शिंदे सरकारवर घणाघात

महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात राज्यात जाणे हे अत्यंत गंभीर असून महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या इशाऱ्यावर चालतो हे स्पष्ट झालेले आहे. मोदी- शाह यांच्या इशाऱ्यावरच महाराष्ट्राचा कारभार चालत असून एकनाथ शिंदे हे केवळ नाममात्र मुख्यमंत्री आहेत. फॉक्सकॉन गुजरातला जाणे म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Wed, 14 Sep 202208:05 AM IST

Bachchu Kadu: आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी

राजकीय आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं होतं. त्याविरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना जामीन देण्यास गिरगाव न्यायालयानं नकार दिला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Wed, 14 Sep 202206:25 AM IST

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसची दिल्लीच्या गुन्हे शाखेकडून चौकशी

सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिनं आज गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली.

Wed, 14 Sep 202206:20 AM IST

Share Market: पडझडीनंतर शेअर बाजार पुन्हा सावरला!

सकाळच्या सत्रात जवळपास १ हजार अंकांनी कोसळलेला शेअर बाजार हळूहळू सावरताना दिसत आहे. सध्या सेन्सेक्स ३३९ अंकांनी घसरलेला दिसत असून निफ्टी ९४ अंकांनी घसरून १७,९७४ वर ट्रेड करत आहे.

Wed, 14 Sep 202205:28 AM IST

Kashmir Bus Accident: बस दरीत कोसळून ११ जण ठार

जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील बरेरी इथं एक बस दरीत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण जखमी झाले आहेत. बस सौजियाकडून मंडीच्या दिशेने जात होती. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरू आहे.

Wed, 14 Sep 202204:41 AM IST

MNS: मुंबईत मनसे स्वबळावर लढणार; सर्व २२७ जागा लढणार - संदीप देशपांडे

मुंबई महापालिकेची निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढणार आहे. महापालिकेच्या सर्व २२७ जागा मनसे लढणार असल्याचं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Wed, 14 Sep 202203:47 AM IST

Share Market: शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्स ७०० अंकांनी खाली

गेल्या काही दिवसांपासून तेजीत असलेल्या शेअर बाजारात आज अचानक मोठी पडझड झाली आहे. बाजार उघडताच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १ हजार अंकांनी खाली गेला, नंतर काहीसा सावरला. तर निफ्टीतही मोठी घसरण झाली आहे. 

Wed, 14 Sep 202203:18 AM IST

राज्यात आजही अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. आजही हवामान विभागाने राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय सिंधुदुर्ग, ठाण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Wed, 14 Sep 202202:17 AM IST

Vedanta Foxconn: वेदांताचा प्रकल्प गुजरातला का गेला? CM शिंदेंनी दिलं स्पष्टीकरण

वेंदाता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेल्यानं राज्य सरकारवर टीका होत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचं सरकार आल्यानंतर कंपनीच्या मालकांसोबत बैठक घेतली होती तेव्हा सरकारकडून शक्य त्या सवलती देण्यात येतील असं सांगितलं होतं.या प्रकल्पाला गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.