मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रा. साईबाबांची सुटका कायम की पुन्हा तुरुंगवास.. HC च्या निर्णयाविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

प्रा. साईबाबांची सुटका कायम की पुन्हा तुरुंगवास.. HC च्या निर्णयाविरोधात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 15, 2022 10:44 AM IST

प्रा. साईबाबांना (GN saibaba) निर्दोष मुक्त करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सरकारच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

प्रा. साईबाबा
प्रा. साईबाबा

दिल्ली विद्यापीठाचे प्रा. जी.एन. साईबाबा (GN sai baba) यांची मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठानं निर्दोष मुक्तता केली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून सरकारच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

प्रा.जी.एन. साईबाबा यांना निर्दोष मुक्त करणं हा न्यायालयाचा निर्णय शहीदांच्या कुटूंबावर अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात बोलताना केले होते. तसेच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली होती.

प्रा. साईबाबाप्रकरणी आज दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांतून शुक्रवारी उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्यानंतर याचा फैसला आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा आणि इतर पाच जणांची शुक्रवारी निर्दोष मुक्तता केली होती. उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये गडचिरोली सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली. मे २०१४ मध्ये नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून साईबाबा यांना अटक करण्यात आली होती. जी.एन. साईबाबा हे २०१३ पर्यंत दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

पोलिसांनी प्रा. साईबाबा यांच्या घराती झडती घेतली असता पोलिसांना अनेक डिजिटल पुरावे, आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याचा दावा करत जी एन साईबाबांना अटक केली होती.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या