मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bombay HC Aurangabad Bench: मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा फोन
Bombay HC Aurangabad Bench
Bombay HC Aurangabad Bench

Bombay HC Aurangabad Bench: मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा फोन

15 February 2023, 15:31 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Aurangabad News: मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्याने एकच खळबळ माजली. या संदर्भात माहिती मिळताच सुरत्रा यंत्रणा सतर्क झाली. पुंडलिक नगर पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाच्या पथकांनी उच्च न्यायालयाच्या इमारतीत पोहोचून व्यापक शोध घेतला. मात्र, त्यांना कोणतीही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नाही. हा फोन बिहारमधून आल्याचे चौकशीतून समारे आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथील पोलीस नियंत्रण कक्षाला मंगळवारी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला. फोनमध्ये अज्ञात व्यक्तीने पैसे देऊनही माझे काम झाले नसल्याने मी उच्च न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. यानंतर पुडलिक पोलीसांनी बॉम्ब शोधक आणि निकामी पथकाच्या पथकांनी आजुबाजूचे परिसर आणि इमारतीच्या दोन्ही मजल्यावर शोध घेतला. मात्र, त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

पुणे: गूगलचे ऑफीस बॉम्बने उडवून देण्याची धमकी

दरम्यान, सोमवारी पुण्यातील गूगलच्या ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला हैदराबादमधून अटक करण्यात आली. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील गूगलच्या ऑफिसमध्ये फोन ठेवण्यात आल्याचा आरोपीने फोन केला होता. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाकडून गूगलच्या ऑफिसची आणि आजूबाजुच्या परिसराची पाहणी करण्यात आली. मात्र, पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. मात्र, बॉम्ब ठेवल्याच्या फोननंतर परिसरात घबराट पसरली होती.