मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Live Updates Todays Latest News 19 May 2022

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संदीप देशपांडे

Live Blog: मनसेचे नेते संदीप देशपांडेंना दिलासा, न्यायालयाने मंजूर केला जामीन

Daily News Update

Thu, 19 May 202211:47 AM IST

मनसे नेते बाळा नांदगावकर प्रसार माध्यमांशी साधणार संवाद

मनसेचे नेते बाळा नांदगावकर आज संध्याकाळी ६ वाजता पत्रकारांशी संवाद सादणार आहेत.राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या सभेवर काही अधिक माहिती इथे मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय संदीप देशपांडे प्रकरणावरही बाळा नांदगावकर पत्रकारांशी संवाद साधू शकतील. याशिवाय दिपाली सय्यद यांनी अलिकडच्या काळात मनसे वर केलेली जिव्हारी लागणारी टीका यावरही नांदगावकर भाष्य करताना पाहायला मिळू शकतील.

<p>मनसेचे नेते बाळा नांदगावकर</p>
मनसेचे नेते बाळा नांदगावकर (हिंदुस्तान टाइम्स)

Thu, 19 May 202209:24 AM IST

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सरकारी कार्यालयात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

Thu, 19 May 202208:45 AM IST

पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, वरिष्ठ नेते सुनील जाखड यांचा भाजपमध्ये प्रवेश

Thu, 19 May 202208:44 AM IST

ज्येष्ठ पत्रकार ताराचंद म्हस्के व औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी सभापती मारुती साळवे यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

Thu, 19 May 202208:16 AM IST

दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या प्रकरणात काश्मिरातील फुटिरतावादी नेता यासिन मलिक दोषी. २५ मे रोजी एनआयए कोर्ट शिक्षा सुनावणार

Thu, 19 May 202207:59 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिरा भाईंदर शहर जिल्हाध्यक्षपदी अरुण बाबाजी कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी याबाबत निवडीचे पत्र अरुण कदम यांना दिले आहे.

Thu, 19 May 202207:22 AM IST

कृष्ण जन्मभूमी केस : शाही इदगाह मशिदीविरोधात खटला दाखल करण्यास कोर्टाची मंजुरी

Thu, 19 May 202206:29 AM IST

वाराणसी कोर्टाने कोणतेही आदेश देऊ नयेत, ज्ञानवापी प्रकरणी उद्या सुनावणी

ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यावर वाराणसी न्यायालयाने या प्रकऱणी कोणताही आदेश उद्यापर्यंत देऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

Thu, 19 May 202205:16 AM IST

औरंगजेबाची कबर आजपासून पर्यटकांसाठी बंद, भारतीय पुरातत्व खात्याचा निर्णय

औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. आता खबरदारी म्हणून खुलताबादमधील औरंगजेबाची कबर पर्यटक आणि इतर लोकांसाठी बंद कऱण्यात आली असून याबाबतचा आदेश भारतीय पुरातत्व विभागाने काढला आहे.

Thu, 19 May 202204:10 AM IST

शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स १ हजार अंकांनी खाली

शेअर बाजारात गुरुवारी सकाळी मोठी घसरण झाली आहे. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स १ हजार अंकांची तर निफ्टित ३०० अंकाची घसरण झाल्याचं दिसून येत आहे.

Thu, 19 May 202203:03 AM IST

फिनलँड, स्वीडनचा नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज, बायडेन यांच्याकडून स्वागत

नाटोच्या सदस्यत्वासाठी फिनलँड आणि स्वीडनने अर्ज केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दोन्ही देशांनी केलेल्या अर्जाचं स्वागत केलं असून नाटोमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याबाबत उत्सुक असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी म्हटलं आहे.

Thu, 19 May 202202:03 AM IST

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात ईडीने दाखल केला गुन्हा

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राविरोधात ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पॉर्न रॅकेट प्रकरणाशी संबंंधित त्याच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आल्याचं समोर येत आहे. सध्या जामीनावर बाहेर असलेल्या राज कुंद्राला पॉर्न रॅकेट प्रकरणी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली होती.

WhatsApp channel