मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalna crime : कौटुंबिक वादाचा भयानक अंत.. पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; तीन मुलं पोरकी

Jalna crime : कौटुंबिक वादाचा भयानक अंत.. पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; तीन मुलं पोरकी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 12, 2023 11:47 PM IST

Jalna crime news : घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करत तिची हत्या केली व त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

जालन्यातील मंठा तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. घरगुती वाद किती विकोपाला जाऊ शकतात व त्यातून कसा अनर्थ घडू शकतो, हे दाखवणारी घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करत तिची हत्या केली व त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे गावात घडली.

या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने शेतात जाऊन एका झाडाला गळफास घेतला. मुले खेळायला बाहेर गेली असताना ही हृदयद्रावक घटना घडली. यानंतर त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृद्य पिळवटून टाकणारा होता.

संजय अंकुश पवार आणि पत्नी संगीता संजय पवार,अशी मृत्युमुखी पडलेल्या पती-पत्नीची नावे आहेत.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,दहिफळ खंदारे गावात संजय पवार पत्नी संगीता व तीन मुलांसह राहतात.कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पती-पत्नीमध्येनेहमी वाद व्हायचे.

 

शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यावर संजयने संगीताला मारहाण केली.त्यानंतर चिडलेल्यासंजयने पत्नी संगीताच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केला. हा वार वर्मी लागल्याने संगीताचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्युनंतर संजयने शेत गाठले व गळफास घेऊन आपलेही जीवन संपवले.

IPL_Entry_Point

विभाग