मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जालन्यात दुचाकीची बैलगाडीला जोरदार धडक.. महिला पोलिसाचा जागीच मृत्यू

जालन्यात दुचाकीची बैलगाडीला जोरदार धडक.. महिला पोलिसाचा जागीच मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 15, 2023 10:18 PM IST

woman policeman died in accident : जालना-भोकरदन मार्गावर राजूर येथे झालेल्या दुचाकी व बैलगाडीच्या धडकेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृत सुनिता ईश्वरसिंग ढोबाळ
मृत सुनिता ईश्वरसिंग ढोबाळ

जालना– जालना-भोकरदन मार्गावर झालेल्या अपघातात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. महिला पोलिसाची दुचाकीसमोरून बैलगाडीवर आदळली. हा अपघातराजूर येथेरविवारी दुपारच्या सुमारास घडला.

सुनिता ईश्वरसिंग ढोबाळ असे अपघातात मृत्यू झालेल्या या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस दलात असलेल्या पतीच्या निधनानंतर सुनिता त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. मात्र बैलगाडीच्या ध़डकेत त्यांचा मृत्यू झाला.

सुनिता त्यांच्या मुलासह दुचाकीवरून मूळ गाव भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथून जालन्याकडे जात होत्या. त्या जालन्यात सेवा बजावत होत्या. त्यांचा मुलगा दुचाकी चालवत होता व त्या मागे बसल्या होत्या. राजूरजवळ त्यांच्या गाडीने बैलगाडीला धडक दिली. यात सुनिता यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मृत पोलीस कर्मचारी सुनिता ईश्वरसिंग ढोबाळ यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या