मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Avdhoot Tatkare: शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही धक्का! माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये

Avdhoot Tatkare: शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही धक्का! माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 14, 2022 07:13 PM IST

Avdhoot Tatkare Joins BJP : शिवसेनेचे माजी आमदार आणि सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

Avdhoot Tatkare
Avdhoot Tatkare

Shiv Sena Ex MLA Avdhoot Tatkare Join BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे माजी आमदार अवधूत तटकरे हे आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी तटकरे यांचं पक्षात स्वागत केलं. सुनील तटकरे यांच्याबरोबच उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

अवधूत तटकरे यांचे काका सुनील तटकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या राजकीय कलहामुळं आणि राष्ट्रवादी-शिवसेनेची आघाडी असल्यामुळं त्यांनी वेगळा विचार सुरू केला होता. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. ती खरी ठरली आहे. अवधूत तटकरे हे रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांच्या पक्षांतरामुळं भाजपला आता या भागात शिरकाव करण्याची संधी मिळणार आहे.

कोण आहेत अवधूत तटकरे?

अवधूत तटकरे हे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे आणि कन्या आदिती तटकरे यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अवधूत यांचे सुनील तटकरेंशी मतभेद झाले होते. अवधूत तटकरे यांनी यापूर्वी रोहा शहराचं नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे ते विधानसभेत होते. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवरही संधी देण्यात आली होती. 

शिवसेना व भाजपची युती असताना भाजपनं कोकण पट्ट्यात शिवसेनेला महत्त्व दिलं होतं. आता मात्र भाजप कोकणता मजबूत होत आहे. कोकण, पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे असंख्य नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असं बावनकुळे यावेळी म्हणाले.

IPL_Entry_Point