मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Enforcement Directorate: मुंबईत ED ची छापेमारी,९१ किलो सोनं व ३४० किलो चांदी जप्त

Enforcement Directorate: मुंबईत ED ची छापेमारी,९१ किलो सोनं व ३४० किलो चांदी जप्त

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 14, 2022 07:21 PM IST

ईडीच्या टीमने मुंबईत मोठी कारवाई करत जवळपास ४७ कोटींचे सोने-चांदी जप्त केले आहे.मुंबईतील सराफ व्यापाऱ्यांच्या भागात इडीच्या अधिकाऱ्यांना मोठा खजिना सापडला आहे. यामध्ये तब्बल ९१ किलो सोने आणि ३४०किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.

मुंबईतEDचीछापेमारी
मुंबईतEDचीछापेमारी

मुंबई– सक्तवसुली संचलनालयाने गेल्या तीन महिन्यात केलेल्या छापेमारीत तब्बल १०० कोटींची रोकड जप्त केली आहे. आज ईडीच्या टीमने मुंबईत मोठी कारवाई करत जवळपास ४७ कोटींचे सोने-चांदी जप्त केले आहे. मुंबईतील सराफ व्यापाऱ्यांच्या भागात इडीच्या अधिकाऱ्यांना मोठा खजिना सापडला आहे. यामध्ये तब्बल ९१ किलो सोने आणि ३४० किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात पारेख एल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या विरोधात कारवाई करताना ईडीला मागील आठवड्यात हे घबाड सापडलं होतं.

छापेमारीत ईडीला मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात खासगी लॉकरच्या चाव्या सापडल्या होत्या. या लॉकरची तपासणी केली असता हे लॉकर अवैधपणे चालवले जात असल्याचे आढळून आले. केवायसीचं पालन न करता तसेच लॉकरच्या परिसरात सीसीटीव्ही तसेच कोणतंही रजिस्टर नसल्याची बाब ईडीच्या निर्देशनास आली.

इडीने लॉकरची झडती घेतली असतात्यात ७६१ लॉकर्स आढळून आले, यातले ३ लॉकर्स मेसर्स रक्षा बुलियनचे होते. त्यातील २ लॉकरमध्ये ९१.५किलो सोने तर १५२ किलो चांदी सापडली. त्याशिवाय मेसर्स रक्षा बुलियनच्या आवारात अतिरिक्त १८८ किलो चांदीही सापडली आहे. हा माल ईडीने जप्त केला आहे. या सोने-चांदीची किंमत ४७.७६ कोटी इतकी आहे.

यापूर्वी ईडीने मार्च २०१८ मध्ये पीएमएलए २००२ च्या तरतुदींनुसार मेसर्स पारेख एल्युमिनेक्स लिमिटेडविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती. या कंपनीवर बँकांना फसवून २ लाख २९६ हजार ५८ कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग