मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ZP Elections: मोठी बातमी! राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्थगित
zp election
zp election
05 August 2022, 19:12 ISTNinad Vijayrao Deshmukh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 19:12 IST
  • Maharashtra Zilla parishad and panchayat samiti election: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. या निवडणुकांच्या आरक्षण प्रक्रिया पार पडली होती. मात्र, निवडणूक स्थगित करण्यात आल्याने आता पुन्हा नव्याने ही प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Zilla parishad and panchayat samiti election: एकनाथ शिंदे सरकारने आता पुन्हा एक धक्का विरोधकांना दिला आहे. राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. यामुळे आरक्षणाची जी सोडत झाली होती ती आता पुन्हा राबविली जाणार आहे. एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषदांच्या गटांची संख्या ही कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त ७५ ठेवण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला होता. यामुळे आरक्षणात फेरबदल होणार असल्याने आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवावी लागणार आहे. यामुळे या निवडणूका रद्द करण्यात आल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यातल्या २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज प्रसिद्ध होणार होती. राज्यातील काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी ८ तर 12 जिल्हा परिषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, या सर्व प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर निवडणूक पात्र सर्व महापालिकांच्या निवडणुका लवकर घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. असे असतांनाही न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका फेटाळण्यात आली होती. न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगावार अवमानाची कारवाई करण्याचा इशाराही न्यायालायने दिला होता. असे असतांनाही कायद्यात बदल करण्याच्या नावाखाली ही प्रक्रिया रद्द करण्यात आली.

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, ९१६१ मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे सदस्य संख्या ही कमीत कमी ५० तर जास्तीत जास्त ७५ करण्याचे ठरले. यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग