मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, दोनदा फोन करून धमकावले

Sanjay Raut : संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी, दोनदा फोन करून धमकावले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 08, 2022 12:40 PM IST

Death Threats to Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी दोन निनावी फोन येत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मंत्री शभुराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना धमकीचे फोन आले आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut (HT)

मुंबई : शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ असलेले खासदार संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा विरोधकांवर हल्ला चढवला आहे. सरकारवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. दरम्यान, संजय राऊत यांना बुधवारी दोन वेळा निनावी फोन आले असून त्यांना फोन करणाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

राज्यात सध्या कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून राजकारण पेटले आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर यावरुन टीका केली होती. सरकार नामर्द असल्याची टीका राऊत यांनी केली होती. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्यावर पलटवार करत जोरदार हल्ला चढवला होता. राऊतांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवावा असे शंभुराजे देसाई यांनी म्हटले होते. दरम्यान ही पत्रकार परिषद झाल्यावर संजय राऊत यांना दोन वेळा धमकीचे फोन आले. दरम्यान, हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून दोन्ही राज्यात तेढ निर्माण झाली आहे. कन्नड रक्षण वेदिके या कर्नाटकातील संघटनेने महराष्ट्राच्या ट्रक आणि बस गाड्यांवर दगडफेक केल्याने वातावरण चिघळले होते. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. संजय राऊत यांनी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी करत हा वादामागे भाजपचा हात असल्याचाही आरोप केला होता.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग