मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Balasaheb Thorat : राज ठाकरे यांच्यात पूर्वीचा लढाऊ बाणा राहिला नाही; बाळासाहेब थोरात यांचा टोला

Balasaheb Thorat : राज ठाकरे यांच्यात पूर्वीचा लढाऊ बाणा राहिला नाही; बाळासाहेब थोरात यांचा टोला

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 07, 2022 02:38 PM IST

Balasaheb Thorat on Raj Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवरून नवे राजकीय समिकरण येत्या महानगर पालिकेच्या निवडणुकात दिसणार आहे. यावरून कोंग्रेसचे नेते बाळलासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

बाळासाहेब थोरात - राज ठाकरे
बाळासाहेब थोरात - राज ठाकरे

पुणे : राज्यात येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणुकांवरून अनेक नवे राजकीय समीकरणे पाहायला मिळणार आहे. नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची युती होणार अशी चर्चा सुरू आहे. या बद्दल कॉँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. थोरात म्हणाले, दोघांची युती झाली तरी, राज ठाकरे यांच्यात लढण्याचा पूर्वीसारखा लढाऊबाणा राहिला नाही असे थोरात म्हणाले.

पुण्यात एका सार्वजनिक गणपती दर्शनासाठी बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी माध्यमांच्या प्रतरीनिधींनी त्यांना एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी संदर्भात प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी वरील टीका केली. बाळासाहेब थोरात म्हणाले, राज ठाकरेंमध्ये पूर्वीसारखा लढाऊबाणा आता राहिलेला नाही. आम्ही ज्या राज ठाकरेंना पाहिले होते, ते आता पूर्वीसारखे राज ठाकरे राहिलेले नाहीत. मनसे आणि शिंदे सेना एकत्र येतीलही पण आता राज ठाकरेंमध्ये लढाऊबाणा राहिलेला नाही. थोरात यांनी भाजपच्या धोरणावरी टीका केली आहे. ते म्हणाले, 'भाजपाला काहीही करा पण सत्ता हवी' हेच त्यांच धोरण झाले आहे. लोकशाहीला हे अभिप्रेत नाही. सत्ते करता काहीही हेच अमित शहांच्या भाषणातही दिसले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. महाविकास आघाडी आजही एकत्र आहे. भाजपाची कार्यप्रणाली लोकशाहीला अनुकूल नाही. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील राहील, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या