मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Coastal Road : कोस्टल रोड कामाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आंदोलनकर्त्यांना यश

Coastal Road : कोस्टल रोड कामाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, आंदोलनकर्त्यांना यश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 15, 2022 09:09 PM IST

Coastal Road work mumbai : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाला स्थानिक मच्छिमार व कोळी बांधवांचा विरोध होता. या प्रकल्पातील दोन पिलरमधील अंतर १२० मीटर असावे अशी त्यांची मागणी होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर तोडगा काढला आहे.

कोस्टल रोड
कोस्टल रोड

मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या कोस्टल रोडच्या कामाबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत याला होणाऱ्या विरोधावर तोडगा काढला आहे. स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांनी या रोडला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.मात्र आता या प्रकरणात आंदोलनकर्त्यांना यश आले आहे.

कोस्टल रोड प्रकल्पातील जाचक अटींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेऊन महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. कोस्टल रोड प्रकल्पात दोन पीलरमधील अंतर ६० मीटर वरून वाढवून आता १२० मीटर असणार आहे, याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. या बैठकीसाठी कोस्टल रोड बाधित कोळी समाज समितीचे सदस्यही उपस्थित होते.

कोस्टल प्रकल्पात बांधल्या जाणाऱ्या खांबांपैकी २ खांबांमधील अंतर हे १२० मीटर असावे अशी मागणी या प्रकल्पातील बाधित कोळी बांधवांनी लावून धरली होती. ही मागणी आज मान्य करण्यात आल्यानं प्रकल्पग्रस्तांनी सरकारचे आभार व्यक्त केले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की,कोस्टल रोड शहरासाठी महत्वाचा पायाभूत प्रकल्पआहे. मात्रज्या ठिकाणी प्रकल्प राबवतोय तिथं लोकांवर अन्याय होऊ नये अशी बाळासाहेबांचीही भूमिका राहिली आहे. प्रकल्पातील दोन पिलरमधील अंतर ६० मीटर ऐवजी १२० मीटर असावं अशी मागणी होती. पण प्रकल्पाचं काम ७० टक्के पूर्ण झाल्यानं अडचण निर्माण झाली होती. यात काय तोडगा काढता येईल यासाठी  महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लक्ष घालण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांनी यासंबंधीची सर्व माहिती घेत अखेर या प्रश्नावर तोडगा निघाला आहे.यासाठी अतिरिक्त निधी लागणार आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या