मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Holi 2023 : राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात होऊ दे..'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून होलिकादहन

Holi 2023 : राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात होऊ दे..'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून होलिकादहन

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 06, 2023 10:17 PM IST

Eknath shinde celebrated Holika Dahan : जळणाऱ्या अग्नीसोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात व्हावेत आणि सद्विचारांचा सहवास घडावा अशी प्रार्थना केली, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना होलिकोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून होलिकादहन
मुख्यमंत्र्यांकडून होलिकादहन

Holi 2023 : संपूर्ण देशासह राज्यात सोमवारी होळीची धूम पाहायला मिळत आहे. मकर संक्रांतीनंतरचा मोठा सण म्हणजे होळी राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. राज्यातील काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने होळीच्या आनंदावर विरजण पडले, मात्र ठिकठिकाणी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्यावर होलिकादहन करत राज्यातील जनतेला होळी व धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे की, होळीपौर्णिमेनिमित्त वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या होलीकोत्सवात सहभागी होत मनोभावे पूजन केले. जळणाऱ्या अग्नी सोबत राज्यातील दुष्ट विचार होळीत भस्मसात व्हावेत आणि सद्विचारांचा सहवास घडावा अशी प्रार्थना केली. राज्यातील सर्व नागरिकांना होलिकोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा.

 

होळी हा हिंदूं धर्मातील अत्यंत महत्वाचा सण समजला जातो. वसंत ऋतूचे स्वागत होळीच्या माध्यमातून व रंगाची उधळत करत केले जाते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, प्रतीकात्मकपणे सर्व वाईट सवयी जाळून टाकण्यासाठी होलिका दहन केले जाते तर रंगीबेरंगी आणि दोलायमान नवीन भविष्याचा मार्ग उघडण्यासाठी दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण केली जाते.

IPL_Entry_Point

विभाग