बीड : भापजच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा आज सावरगाव येथे दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात मुंडे यांच्या भाषणानंतर अचानक मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे स्टेजजवळ गेल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यामुळे परिस्तिती आणखीनच चिघळली. दरम्यान, पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते हे स्टेजकडे गेल्याने तसेच काहींना मुंडे यांच्या सोबत फोटो काढायचा असल्याने मोठी गर्दी झाली आणि ती पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याची प्राथमिक महिती मिळत आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथे दसरा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी कायम संघर्ष करत राहणार असल्याचे सांगितले. या मेळाव्यात त्यांनी अनेक खुलासे केले. त्यांच्या या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे जमले होते. पंकजा मुंडे यांच्या भाषणांनंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे स्टेजकडे गेले. यावेळी काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाले. तसेच मोठ्या प्रमाणात स्टेज जवळ गर्दी झाल्याने हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी करत पोलीस आणि कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र पंकजा मुंडे यांचे भाषण झाल्यावर पुन्हा कार्यकर्ते हे स्टेज जवळ गेले आणि पंकजा मुंडे यांच्याकडे फोटोचा आग्रह धरला. यामुळे मोठा गोंधळ झाल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठी चार्ज केला.
दरम्यान, या लाठीचार्जमुळे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला गालबोट लागले आहे. या मेळाव्यातून मुंडे यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवून दाखवली आहे. मात्र, त्यांच्या भाषणानंतर झालेला गोंधळ कशामुळे झाला याची माहिती देखील घेतली जात आहे.
संबंधित बातम्या