मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसलेंना ३० मे पर्यंत नजरकैद, CBI कोर्टाचा मोठा निर्णय
अविनाश भोसले
अविनाश भोसले
27 May 2022, 18:30 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 May 2022, 18:30 IST
  • अविनाश भोसले यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. विशेष  CBI कोर्टाने उद्योगपती अविनाश भोसले यांना ३० मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई – पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना काल (गुरुवारी) रात्री सीबीआयने (CBI) अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. मुंबई सेशन कोर्टातील (Mumbai Session Court) विशेष CBI कोर्टाने उद्योगपती अविनाश भोसले यांना ३० मे पर्यंत नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार अविनाश भोसले यांना सीबीआयच्या गेस्टहाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. या गेस्टहाऊसमध्ये अविनाश भोसेल यांना त्यांचे वकील आणि  परीवारातील एक सदस्यच भेटू शकणार आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर आता अविनाश भोसलेंची नजरकैदेत रवानगी करण्यात आली आहे. अविनाश भोसलेंना सीबीआयच्या बीकेसीतील विश्रामगृहात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

सीबीआयने अविनाश भोसलेंची १० दिवसांकरता रिमांड मागितली होती. मात्र सीबीआयची कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्यावतीने रिमांडला विरोध करण्यात आला. विशेष म्हणजे भोसलेंच्या रिमांडला विरोध करणारा अर्जही कोर्टात दाखल करण्यात आला. पण सीबीआयने त्या अर्जावर उत्तर देण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत मागितली. तसेच तोपर्यंत भोसलेंना नजरकैदेत ठेवावी, अशी मागणी केली. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर अविनाश भोसलेंना ३० मे पर्यंत सीबीआयच्या गेस्टहाऊसमध्ये नजरकैदेत ठेवण्याता आदेश दिला. तसेच भोसलेंना ३० मे रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.

डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. 

पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना गुरुवारी रात्री CBI  कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून २०२१ मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल ४०  कोटी ३४ लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. आता DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.

अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख आहेत. अविनाश भोसले यांचे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचे ते सासरे आहेत.

 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग