मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  GST Fraud Case: भिवंडीत १३२ कोटींच्या बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश

GST Fraud Case: भिवंडीत १३२ कोटींच्या बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 11, 2022 09:05 AM IST

GST Fraud Case: जीएसटी भिवंडी आयुक्तालयाने केलेल्या कारवाईत २३ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचं उघडकीस आलं.

बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश
बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश

GST Fraud Case: बनावट पावत्या तयार करून जीएसटीचे क्रेडिट घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर जीएसटी भिवंडी आय़ुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १३२ कोटी रुपयांचे रॅकेट उघडकीस आलं आहे. याआधीही अशा प्रकारे बनावट इनव्हॉइस दाखवून टॅक्स क्रेडीट घेतल्याचा प्रकार समोर आला होता.

जीएसटी भिवंडी आयुक्तालयाने केलेल्या कारवाईत २३ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी बनावट रॅकेटचा मास्टरमाइंड हसमुख पटेल याला पोलिसांनी अटक केली आहे.

बनावट इनव्हॉइचं रॅकेट सीजीएसटी भिवंडी आय़ुक्तालयाने उघडकीस आणले आहे. हे रॅकेट जवळपास १३२ कोटी रुपयांचं असून यातून २३ कोटी रुपयांच्या इनपूट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला असल्याचं सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने म्हटलं आहे. बनावट इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर याप्रकरणी मास्टरमाइंड हसमुख पटेलला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने २३ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग