मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  औरंगाबादमध्ये राडा.. मनसेकडून PFI संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

औरंगाबादमध्ये राडा.. मनसेकडून PFI संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 25, 2022 03:50 PM IST

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर देशभरात कारवाई करण्यात आली आहे. अशातच पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा निषेध करत औरंगाबादमध्येमनसेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.

मनसेकडूनPFIसंघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न
मनसेकडूनPFIसंघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

औरंगाबाद - पुण्यातील पाकिस्तान झिंदाबाद घोषणेचा निषेध करण्यासाठी आज मनसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी वंदे मातरम.. पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच काहींनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला. मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनांचीही चांगलीच धावपळ झाली. झाल्याचे दिसून आले. दरम्यान औरंगाबादमध्ये  मनसेनं PFI संघटनेचं कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला.

पुण्यातील पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजीचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर देशभरात कारवाई करण्यात आली आहे. अशातच पुण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेचा निषेध करत औरंगाबादमध्ये मनसेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने PIF संघटनेचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला.

पुण्यातील पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजीबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबादमध्ये किराडपुरा भागात मनसे सैनिकांनी पीआयएफ संघटनेच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पीएफआयच्या कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पण पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वेळीच ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी झेंडे, रंग, इत्यादी साहित्य आंदोलकांकडून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएफआय आणि संबंधित आंदोलकांवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुकवर संबंधित व्हिडीओ शेअर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे घोषणाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ही कीड समूळ नष्टच करा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याशिवाय'तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा' असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या